Mangi Tungi : महाराष्ट्रातील ‘या’ सिध्दक्षेत्राला जाण्यासाठी चढाव्या लागतात 2 हजाराहून जास्त पायऱ्या; तुम्ही गेलाय का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mangi Tungi) संपूर्ण महाराष्ट्राला अनेक प्राचीन मंदिरे आणि पुरातन वास्तूंचा विशेष इतिहास लाभला आहे, हे काही नव्याने सांगायला नको. मात्र यांपैकी काही वास्तू फारच विशेष आहेत. महाराष्ट्रातील पुरातन मंदिरांचा इतिहास हा कायम रंजक असल्याचे समोर आले आहे. इतकेच नव्हे तर प्रत्येक मंदिराची एक आख्यायिका आहे. जी त्या मंदिराची खासियत आणि वैशिट्य सांगते. आज आपण अशाच एक अत्यंत रमणीय तीर्थस्थळाविषयी माहिती घेणार आहोत. या सिध्दक्षेत्राला मांगी तुंगी शिखर म्हणून ओळखतात. जिथे पोहोचण्यासाठी २ हजाराहून जास्त पायऱ्या चढून जावे लागते. चला या तीर्थक्षेत्राविषयी अधिक माहिती घेऊया.

सिद्धक्षेत्र मांगी तुंगी शिखर (Mangi Tungi)

नाशिकपासून १२५ किलोमीटर दूर अंतरावर सटाणा तालुक्यात हे सिद्ध क्षेत्र आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ४ हजार फूटपेक्षा जास्त उंचीवर हे मंदिर आहे. या सिद्ध क्षेत्रापर्यंत जाण्यासाठी २००० च्या आसपास पायऱ्या चढाव्या लागतात. मांगी तुंगीच्या पायथ्याशी भिलवाडी नावाचे गाव आहे. जिथून या पायऱ्या सुरु होतात. जिथे जैन धर्मीयांचे पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांची १०८ फूट उंच अशी भव्य मूर्ती पहायला मिळते ही मूर्ती मांगी डोंगरावर सुमारे ४५०० फूट उंचीवर आहे. माहितीनुसार, ही मूर्ती तयार करण्यासाठी १९ वर्षे इतका कालावधी लागला होता.

मांगी शिखर

माहितीनुसार, मांगी शिखराची उंची फार जास्त नाही. असे असले तरीही गिर्यारोहणाची सवय असलेल्यांनाच हे शिखर सर करता येते असे म्हंटले जाते. (Mangi Tungi) या शिखराच्या पायथ्याशी भगवान महावीर, अदिनाथ, पार्श्वनाथ, हनुमान, वाली, सुग्रीव अशा काही देवदेवतांच्या एकूण ३५६ कोरीव मुर्ती आहेत. येथील गुफांमध्ये अप्रतिम कोरीव काम केले असून या ठिकाणी मांगीगिरी मंदीर आहे. जे अत्यंत प्रसन्न ठिकाण आहे.

तुंगी शिखर

तुंगी शिखर मांगी शिखरापेक्षा थोडे उंच असे शिखर आहे. या शिखराला प्रदक्षिणा करता येते आणि या प्रदक्षिणा मार्गावर एकूण ३ गुंफा आहेत. ज्यातील एका गुंफेत तुंगीगिरी मंदीर आहे. या मंदिरात भगवान बुद्धांच्या सुंदर अशा ९९ कोरीव मूर्ती पहायला मिळतात.

कसे जाल?

मांगी तुंगी सिद्ध क्षेत्राला जायचे असेल तर तुम्ही रस्ते मार्ग, रेल्वे मार्ग किंवा हवाई मार्गाने देखील जाऊ शकता. रस्ते मार्गाने जायचे असल्यास नाशिक सेंट्रल बस स्थानकापर्यंत तुम्ही बसने जाऊ शकता. (Mangi Tungi) पुढे भिलवाडी सुमारे १२५ किमी अंतरावर आहे. दरम्यान, नाशिकवरून सटाणामार्ग ताहराबादला जा आणि तिथून भिलवाडीपर्यंत एस.टी. किंवा बसने जाता येईल.

याशिवाय रेल्वेने जात असाल तर नाशिक रोड स्टेशनला उतरून पुढे १३० किलोमीटर अंतर जावे लागेल. तसेच हवाई मार्गे जाण्यासाठी इथे सर्वात जवळचे विमानतळ ओझर नाशिक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. (Mangi Tungi) शहराच्या मध्यभागापासून हे विमानतळ २४ किलोमीटर अंतरावर असून नाशिकवरून सटाणामार्ग ताहराबादवरून भिलवाडीपर्यंत जाण्यासाठी एस.टी. किंवा बसने प्रवास करावा लागेल.