माळशिरसचे आमदार हनुमंतराव डोळस यांचे निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अकलूज प्रतिनिधी |माळशिरस मतदारसंघाचे विधानसभा आमदार हनुमंतराव डोळस यांचे आतड्याच्या कर्करोगामुळे निधन झाले आहे. ते ५८ वर्षाचे होते. विजयसिंह मोहिते पाटलांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असणारे हनुमंतराव डोळस हे माळशिरस मतदारसंघातून २००९ आणि २०१४ अशा दोन निवडणुका विजयी झाले होते.

अल्प परिचय 

माळशिरस तालुक्यातील दसूर या गावचे मूळ रहिवासी असणारे डोळस, विजयसिंह मोहिते पाटील यांच्या संपर्कात आले त्यानंतर त्यांनी राजकारणात विधानसभेपर्यत घौडदौड केली. लहानपणी आईवडीलांचे छत्र हरपलेल्या हनुमंतराव डोळस यांनी पंढरपूर या ठिकाणी १२  पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते.

हनुमंतराव डोळस यांनी  चर्मकार महासंघाचे  अध्यक्ष म्हणून देखील काम केले आहे. तसेच म्हाडा गृहनिर्माण संस्थेवर देखील त्यांनी काम केले आहे. माळशिरस मतदारसंघातून २००९ आणि २०१४ असे दोन वेळा ते विधानसभेचे सदस्य म्हणून निवडले गेले होते. मागील काही दिवसांपासून ते आतड्याच्या कर्करोगासोबत झुंज देत होते. त्यांच्यावर मुंबई येथील सैफी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चता त्यांच्या पत्नी कांचन डोळस , मुलगा संकल्प , मुलगी सिद्धी, एक भाऊ आणि चार बहिणी,  असा परिवार आहे. हनुमंतराव डोळस यांच्या जाण्याने मोहिते पाटील समर्थकांमध्ये  शोकाकुल वातावरण आहे. उद्या सकाळी १० वाजता त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणर आहेत.

 

Leave a Comment