Manoj Jarange Patil : … तर सत्ता आपलीच; जरांगे पाटलांचं मिशन विधानसभा, पहा विजयाचा फॉर्म्युला??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 4-5 जाती एकत्र आल्या तर सत्ता आपलीच असं म्हणत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकले आहे. एका जातीच्या मतांच्या आधारावर कुणीही निवडून येऊ शकत नाही. त्यासाठी जातीचे समीकरणं जुळवावे लागतं. राज्यात असा एकही मतदार संघ नाही ज्यात 50 हजार मराठा नाहीत. एका जातीवर कोणीच निवडून येऊ शकत नाही. चार-पाच जाती एकत्र आल्या तर सत्ता आपलीच येणार असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे आजपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना जरांगे पाटलांनी सर्वच राजकीय पक्षांना इशारा दिला आहे. 20 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट दरम्यान मतदार संघनिहाय चर्चा करायची आहे. जे कोणी इच्छुक विधानसभा लढवण्यास इच्छुक आहेत त्यांनी आंतरवली सराटी येथे यावं असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं आहे. आपल्य आंदोलनाला 29 ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्याच दिवशी उमेदवार पाडायचे की निवडून आणायचे याचा निर्णय घेतला जाणार आहे, जो म्हणेल ओबीसीमधून तुमची मागणी पूर्ण करू त्याला निवडून आणायचं असं म्हणत 29 ऑगस्टला कसा डाव टाकतो बघा असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिलाय.

दरम्यान, आज पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसल्याने सरकारच टेन्शन वाढलं आहे. सगेसोयरेची अंमलबजावणी करा, मराठा समाजातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, तीनही गॅझेट लागू करा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे केली आहे. मराठा समाजाच्या मुलांना नोकरभरती, ऍडमिशनमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. Ews सुरू ठेवावे. Ecbc आणि कुणबी हे तीनही प्रमाणपत्र सुरू ठेवावे, अशी मागणी सुद्धा त्यांनी यावेळी केली आहे.