हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Manoj Jarange Patil Mumbai Morcha। मराठा आरक्षणासाठी मुंबई गाठलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असून सकासकाळीच मराठा आंदोलक आणि मुंबई पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. आझाद मैदानावर मुसळधार पावसामुळे मराठा आंदोलक मुंबई महानगरपालिकेच्या समोरच्या रस्त्यावर उतरले असून तिथे त्यांचं आंदोलन सुरू आहे. एक मराठा लाख मराठा.. आता कस, तर पाटील म्हणतील तस अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला आहे. मात्र या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली.. परिणामी पोलिसांची मोठी फौज याठिकाणी दाखल झाली… त्यांनी मराठा आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला… यावेळी मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली.
आमची बसण्याची व्यवस्था तरी सरकारने नीट करावी- Manoj Jarange Patil Mumbai Morcha
मुंबई एकीकडे पाऊस सुरु असताना दुसरीकडे आमच्या खाण्यापिण्याची सोय नाही, खाऊगल्ल्ली बंद केली आहे….. हॉटेलं बंद अशा परिस्थितीमध्ये पोटावर पाय आल्याने मराठा आंदोलक आक्रमक झाले. त्यांनी आपल्यासोबत आणलेली रसद वापरत रस्त्यातच चूल मांडत त्यावर पोहे, नाश्ता बनवण्यात सुरुवात केली आणि आरक्षणाच्या मागणीसाठीच्या घोषणा केल्याचं पाहायला मिळालं. आझाद मैदानावर पाणीच पाणी पाणी साचलं आहे, आम्हाला चिखलात बसावं लागतंय, तिथे कमीत कमी खडी तरी टाकावी, आमची बसण्याची व्यवस्था तरी सरकारने नीट करावी अशी मागणी आंदोलकांकडून केली जात आहे. आम्ही सर्वांना सहकार्य करत असूनही इथं आमच्यासाठी मात्र प्रशासन सहकार्य करतान दिसत नाहीये असं म्हणत मराठा समाजाने संताप व्यक्त केला. Manoj Jarange Patil Mumbai Morcha
आंदोलकांनी सीएसटी आणि बीएमसी बाहेर अक्षरशः रस्ता जाम करून टाकला… ,त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली…. बसेस गाड्या अनेक वेळापासून जागेवरच थांबल्या आहे. त्यामुळे मराठा आंदोलकांनी मुंबईतील हा चौक रिकमा करावा अशी विनंती पोलिसांकडून विनंती करण्यात आली. पण आंदोलक काहीही ऐकण्याच्या तयारीत नाहीत.. जोपर्यंत सरकार मराठा आरक्षणाबाबत सरकार जोपर्यंत भूमिका स्पष्ट करत नाही, तोपर्यंत रस्ता रिकमा केला जाणार नाही, असे मराठा आंदोलकांकडून (Manoj Jarange Patil Mumbai Morcha) स्पष्ट करण्यात आले.




