भरसभेत चक्कर, हात थरथरू लागले; साताऱ्यात जरांगे पाटलांची प्रकृती खालावली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पश्चिम महाराष्ट्रातून शांतता रॅली काढत आहेत. आज त्यांनी रॅली कोल्हापुरातून राजधानी साताऱ्यात आली. मात्र यावेळी भरसभेत मनोज जरांगे पाटील याना चक्कर आली, तसेच त्यांचे हातही थरथर कापू लागले. कार्यकर्त्यांनी त्यांना पाणी दिले. जरांगे पाटील याना अशक्तपणा आल्यानंतर आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता आहे. अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये चिंता वाढली आहे.

आज अत्यंत जोशात आणि जयघोषात मनोज जरांगे पाटील यांची रॅली साताऱ्यात आली. मोठ्या प्रमाणात मराठा बांधव जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जमले होते. हजारोंचा जनसमुदाय साताऱ्यात जमला होता. जरांगे पाटील नेमकं काय मार्गदर्शन करतात? मराठा समाजाला काय आवाहन करतात याकडे संपूर्ण सातारकरांची लक्ष्य लागलं होते. मात्र तत्पूर्वीच जरांगे पाटलांना स्टेजवरच चक्कर आली. अशक्तपणामुळे त्यांचे हात थरथर कापू लागले. स्टेजवरच ते मांडी घालून बसले. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना पाणी दिले. प्रकृती खालावल्यानंतर जरांगे पाटील याना रुग्णालयात दाखल करण्यात येऊ शकते.

कराडमध्ये जल्लोषात स्वागत –

दरम्यान, आज दुपारी कोल्हापूरवरुन कराडमार्गे साताऱ्याकडे जात असताना जरांगे पाटील यांनी कराड येथील वारुंजी फाटा येथील पाटण तिकाटणे येथे मराठा बांधवांची भेट घेतली. यावेळी मराठा समाज बांधवांच्या वतीने जेसीबीव्दारे फुलांचा वर्षाव करुन जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात आले. कोणी कितीही हिणवलं तरी मी मराठा समाजाच्या पाठीशी राहणार आहे. समाजाला आरक्षण मिळेपर्यंत पक्ष सोडून आपल्या लेकरांसाठी एकजुटीने राहावे. मराठा एकत्रित नाही आला की संधीसाधू लोक एकत्र येतात. लोकांना बोलायला जागा ठेवू नका, मराठा एक होत नाही. आपल्याला लढून जिंकायचं आहे असं यावेळी जरांगे पाटील यांनी म्हंटल.