Thursday, March 30, 2023

मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर कोरोना पॉझिटिव्ह

- Advertisement -

औरंगाबाद : मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. शुक्रवारी त्यांना ताप आल्याने त्यांची अँटीजेन टेस्ट केली होती, त्यात त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. सध्या त्या घरीच उपचार घेत आहेत.

शहरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज एक हजार पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहे. त्यात आता आरोग्य वैद्यकीय अधिकारीच पॉझिटीव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे त्यांनी कोरोनाच्या दोन्ही लसींचा डोस पुर्ण केला होता. 2 मार्च रोजी त्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला होता, तरीही त्यांना कोरोनाची लागण झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

- Advertisement -

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group