गुड न्यूज! मान्सून महाराष्ट्रात दाखल; शेतकरी सुखावला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सून ला पोषक वातावरण तयार झाले असून यंदा मान्सून वेळेआधीच दाखल होणार असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले होते. त्यानुसार आज महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले आहे. याबाबत कुलाबा वेधशाळेने घोषणा केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्रातील दक्षिण कोकण, दक्षिण मध्य भाग मान्सूनने व्यापला आहे. मान्सून उत्तरेकडे सरकण्यासाठीचे वातावरण अनुकूल असून यामुळे बळीराजा सुखावला आहे. सध्या शेतकऱ्यांची पेरणी सुरु असून मान्सून वेळेआधी दाखल झाला असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.

हर्णे, सोलापूर, रामगुंड येथे आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मुंबई, पालघर येथे १३, १४ जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता सांगण्यात आली आहे. तसेच पुढील दोन दिवसांत राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता आहे.

Leave a Comment