Mansoon Update| महाराष्ट्रातील लोकांना वाढत्या उकाड्याने हैराण करून सोडले आहे. मात्र आता रेमल वादळामुळे लवकरच मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे. ज्यामुळे उन्हाच्या तडक्यापासून लोकांचे सुटका होईल. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार येत्या, 10 किंवा 11 जूनपासून मुंबईत पाऊस बरसायला सुरुवात होईल. तर 15 जूनपासून मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल. यंदा महाराष्ट्रास राजस्थान, मध्य प्रदेश, ओदिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश अशा इतर भागात 106 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सध्या केरळ भागात मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागली आहे. तर महाराष्ट्रामध्ये उन्हाचा तडाखा जाणवत आहे. मात्र आता रेमल चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात लवकरच सरी बरसायला सुरुवात होईल असा अंदाज बांधला जात आहे. यांना यानुसार पुढील दोन ते तीन दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होईल. तर त्यानंतर महाराष्ट्रात ही मान्सून दाखल होईल. मात्र त्यापूर्वी महाराष्ट्रातील लोकांना काही दिवस उन्हाच्या झळा सहन कराव्या लागणार आहे.
जूनमध्ये उष्णतेची लाट कायम (Mansoon Update)
दरम्यान, पुढील एक ते दोन दिवसांमध्ये विदर्भाच्या तापमानात वाढ होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या काळामध्ये विदर्भातील तापमान 44 ते 49 अंशापर्यंत वाढेल, अशी ही माहिती देण्यात आली आहे. तसेच, जून महिन्यामध्ये हे उत्तर पश्चिम भारत आणि मध्य प्रदेशात उष्णतेची लाट कायम राहील अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसऱ्या बाजूला 29 मेपासून नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होईल. ज्यामुळे राज्यातील अनेक भागात पाऊस आणि गारपीट पडेल.