दिल्ली | सहादत हसन मंटो यांच्या आयुष्यावर आधारीत मंटो नावाचा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येत आहे. नवाझउद्दीन सिद्दकी ची मुख्य भुमिका आणि नंदिता दास यांचे दिग्दर्शन असलेल्या मंटो चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी रिलीज झाला. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंधेला मंटो चित्रपटाने स्वातंत्र्याबाबत मुलभूत प्रश्न निर्माण केले असून संपूर्ण चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना २१ सप्टेंबर पर्यंत वाट पहावी लागणार आहे.
मंटो यांनी आपल्या कथांमधून नेहमी समजातील भयान वास्तवावर भाष्य केले. काही गोष्टी जशा आहेत तशाच सादर का करु नयेत असा सवाल त्यांनी कायम उभा केला. लोकांच्या गोष्टी जशाच्या तशा लोकांपर्यंत पोहोचवण्यास ते आयुष्यभर झटत राहिले. मंटोच्या कथा आरशासारख्या आहेत ज्यामधे समाज आपली प्रतिमा पाहू शकतो असे मंटोचे मत होते.
माणुस जेव्हा गुलाम होतो तेव्हा आझादीची स्वप्न पहातो. आता आपण आझाद आहोत तर कोणती स्वप्न पहायची? असा प्रश्न स्वतंत्र्यदिना दिवशी मनात पेरुन मंटोने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.