मानवत-पाथरी मार्गावरील विट भट्टीमुळं प्रचंड वायुप्रदूषण; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी। गजानन घुंबरे
राष्ट्रीय महामार्गावर मानवत व पाथरी शहरादरम्यान महामार्गाच्या शेजारी उभारण्यात आलेल्या विट भट्यांतून निघणाऱ्या धुरामुळे महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महामार्गा शेजारील हा भाग वायुप्रदुषीत झाल्याने आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

मानवत व पाथरी तालूक्यातुन जाणाऱ्या व दोन शहरांच्या ८ कि. मी. दरम्यान कल्याण-निर्मल राष्ट्रीय महामार्ग ६१ शेजारी अगदी खेटून या विटभट्या उभारण्यात आल्या आहेत. या वीटभट्टयासाठी लागणारे लाकूड, माती, कोळसा हे कच्चे साहित्य रस्त्या शेजारीच टाकण्यात येत आहे. त्यामुळे साईट पट्टयाने प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना हे जोखमीचे झाले आहे.

ट्रॅक्‍टरच्या साह्याने माती पासून चिखल बनवणे हे काम करत असताना हा चिखल सर्रास महामार्गावर पडल्याचे दिसून येत आहे .त्यामुळेही या ठिकाणाहून जाणारे दुचाकी वाहने घसरून पडण्याची प्रकार घडले आहेत. वीटभट्टी ही अगदी खेटून पेटवण्यात येत असल्याने यातून निघणारा प्रदुषीत धुर आरोग्यास हानिकारक असुन महामार्गावर हवेत पाहायला मिळतो. यातून सकाळच्या व संध्याकाळच्या वेळी जाणाऱ्या वाहनधारकांना श्वसनाचा त्रासासह , दृष्यता कमी होत असल्याने, अपघाताचे प्रमाण मागील काही दिवसात वाढले आहे.

या संपूर्ण प्रकारावर पाथरी व मानवत दोन्ही महसूल विभागाने कानाडोळा केला आहे. त्यामुळे हे वीटभट्टी चालक राजरोसपणे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहेत. सदरील विटभट्या ह्या महामार्गापासुन ५०० मीटर दुर ठेवाव्यात अशी मागणी आता स्थानिक व महामार्गावरून प्रवास करणारे चालक करत आहेत.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment