अनेक बँका ज्येष्ठ नागरिकांना देत आहेत विशेष ऑफर ! 31 मार्चपर्यंत FD केल्यावर मिळेल मोठा नफा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोना साथीच्या काळात एसबीआय, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि बँक ऑफ बडोदा यांनी मे 2020 मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष ऑफर आणल्या आहेत. सिलेक्टेड मॅच्युरिटी पीरियड वाल्या एफडी (Fixed Deposit) मध्ये ज्येष्ठ नागरिकांना लागू असलेल्या व्याज दरापेक्षा 0.50 टक्क्यांपर्यंतच्या अतिरिक्त व्याजाची ऑफर होती. म्हणजे नियमित ग्राहकांच्या व्याजापेक्षा 1 टक्के अधिक व्याज मिळेल. या ऑफरची अंतिम मुदत सध्या 31 मार्च 2021 आहे. म्हणजेच ज्येष्ठ नागरिकाला फायदा घेण्याची संधी मार्च अखेरपर्यंत आहे.

SBI ने वाढविली मुदत
तथापि, देशातील सर्वात मोठी बँक SBI ने ती 30 जून 2021 पर्यंत वाढविली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता ज्येष्ठ नागरिकांकडे 3 महिन्यांपर्यंतची मुदत आहे.

SBI : सध्या SBI मध्ये सामान्य नागरिकांना पाच वर्षांच्या कालावधीसाठी 5.4 टक्के व्याज लाभ मिळतो. जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने या विशेष एफडी योजनेत एफडी घेतली तर त्याला 6.20 % व्याज मिळेल. ही योजना 5 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिकच्या कालावधीसाठी आहे.

HDFC Bank : एचडीएफसी बँकेने ज्येष्ठ नागरिक सेवा सुरू केली. त्यामधील ठेवींवर बँक 0.75 टक्के अधिक व्याज देते. एचडीएफसी बँकेच्या सीनियर सिटीझन केअर एफडी (HDFC Senior Citizen Care) अंतर्गत ज्येष्ठ नागरिकाने फिक्स्ड डिपॉझिट केल्यास एफडीला लागू असलेला व्याज दर 6.25% असेल.

बँक ऑफ बडोदा (BoB): बँक ऑफ बडोदाच्या या विशेष एफडी योजनेअंतर्गत (5 वर्षे ते 10 वर्षे) ज्येष्ठ नागरिकाने फिक्स्ड डिपॉझिट केल्यास एफडीला लागू असलेला व्याज दर 6.25 टक्के राहील.

ICICI Bank: ICICI बँकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी आयसीआयसीआय बँक गोल्डन इयर्स (ICICI Bank Golden Years) योजनांसाठी एक खास एफडी योजना सुरू केली. या योजनेत बँक 0.80 टक्के अधिक व्याज देत आहे. आयसीआयसीआय बँक गोल्डन ईयर एफडी योजना ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक 6.30 टक्के व्याज दर देत आहे.

Leave a Comment