Wednesday, June 7, 2023

राज कुंद्राच्या ऑफिसच्या मिस्ट्री वॉलमध्ये सापडले अनेक बॉक्स, त्यात ठेवलेल्या कागदपत्रांमधून झाले अनेक खुलासे

मुंबई । बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा आणि उद्योगपती राज कुंद्राच्या बाबतीत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची टीम जोरदार तपासणीत गुंतली आहे. गुन्हे शाखेच्या म्हणण्यानुसार राज कुंद्राच्या ऑफिसमध्ये रहस्यमय भिंतीत (Mystery Wall) अनेक बॉक्स ठेवले होते. गुन्हे शाखेच्या पथकाला त्या बॉक्समध्ये अनेक फाईल्स सापडल्या असून त्या फाईल्सचीही तपासणी केली जात आहे.

मिस्ट्री वॉलमध्ये सापडलेल्या या कागदपत्रांची छाननी केल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकास काही अग्रीमेंट मिळाले आहेत. तसेच, काही स्क्रिप्ट देखील सापडलय आहेत, ज्या फ्रेश दिसत आहे, म्हणजेच राज कुंद्राविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतरही अशा कंटेंटवर काम चालू असल्याचे दिसून आले आहे.

सोमवारी (19 जुलै) मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने राज कुंद्रा यांना अश्लील चित्रपट बनविल्याबद्दल आणि काही अ‍ॅप्सद्वारे प्रसारित करण्याबद्दल अटक केली. यानंतर तो 23 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत होता. मुंबईच्या कोर्टाने शुक्रवारी (23 जुलै) राज यांच्या पोलिस कोठडीत 27 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली.

राज कुंद्रा पॉर्न फिल्म प्रकरणात वाईटरित्या गुंतत आहे. तपासणीत पोलिसांना दररोज त्याच्याविरूद्ध नवीन तथ्य आणि पुरावे मिळत आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची टीम राज कुंद्रा पॉर्न फिल्म प्रकरणात सातत्याने मोठे खुलासे करीत आहे.