औरंगाबाद | औरंगाबाद- नगर महामार्ग परिसरातून विविध मोठ्या शहरात जाण्यासाठी नगर याच मार्गाचा वापर केला जातो. मात्र वाळुज ते दहेगाव बंगला (ता. गंगापुर) या मार्गात दहा किलोमीटरवर विविध ठिकाणी हॉटेलवर चहा जेवण नाष्टा व इतर साहित्यांची दुकाने आहेत .अशा दुकानांवर ग्राहक आपली वाहने रस्त्याच्या कडेला उभी करतात. पाठीमागून येणाऱ्या वाहनधारक वाहनांची मोठी दिशाभूल होऊन आपल्या त्याच्या रोजच्या घटना येथे घडत आहे.
औद्योगिक वसाहतीत प्रवेश करणारा हा महामार्ग आहे. खेड्यापाड्यातून आलेली वाहने महामार्गाने वेगाने निघण्याचा प्रयत्न करतात महामार्गावरील उभ्या अस्ताव्यस्त वाहनांमुळे गैरसोय होत आहे.
या रस्त्याने पायी जाणाऱ्या लोकांचे एक्सीडेंट होण्याचे प्रकार जास्त प्रमाणात या महामार्गावर घडत आहे. या ठिकाणी नो पार्किंग झोनचे फलक लावण्याची गरज आहे. हे फलक प्रामुख्याने शिवराई फाटा, लिंबे जळगाव, जिकठाणा फाटा दहेगाव बंगला, ईसारवाडी याठिकाणी लावण्याची खूप आवश्यकता आहे. या रस्त्यात वाहने मध्येच उभी राहत असल्याने महामार्ग पार करण्यासाठी पादचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.