सेनेचे मंत्री सत्तार आणि भुमरे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडतात; राजेश टोपेंची उघड नाराजी

औरंगाबाद – गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीतील घुसफूस अनेकदा बाहेर आली आहे. आता तर थेट मंत्री राजेश टोपे यांनी शिवसेना मंत्र्यांवर नाराजी दर्शवली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मंत्री संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार फोडाफोडी करत असल्याचे वक्तव्य राजेश टोपे यांनी केले आहे. शिवसेना मंत्र्यांकडून आपल्या कार्यकर्त्यांना त्रास होतोय या गोष्टीही खऱ्या आहेत, असे म्हणत त्यांनी शिवसेनेच्या … Read more

जिल्ह्यातील 440 केंद्रांवर आज बारावी इंग्रजीचा पेपर

औरंगाबाद – शाळा तेथे परीक्षांचे नियोजन असल्याने जिल्ह्यातील 470 कनिष्ठ महाविद्यालय शाळांपैकी 153 मुख्य तर 287 उपकेंद्र अशा 440 परीक्षा केंद्रांवर 58 हजार 347 विद्यार्थी आज परीक्षा देणार आहेत. इंग्रजीची परीक्षा असल्याने सर्वाधिक विद्यार्थी आज पेपरला असतात. निकोप वातावरणात परीक्षा पार पाडण्याची खरी परीक्षा मुख्याध्यापकांची असणार आहे. जिल्ह्यातील 7 जिल्हास्तरीय, 9 तालुकास्तरीय, समाजकल्याण, आदिवासी विकास … Read more

शहरातील मेट्रोसाठी करणार पीएमसीची नियुक्ती; प्रशासकांना निर्णय

Mumbai Metro

औरंगाबाद – शहरात मेट्रो रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या महापालिकेने हालचाली सुरू केल्या होत्या. प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी पीएमसी नियुक्त करण्याची फाईल, लेखा विभागात अडकली होती. लेखा विभागाने या प्रकरणाचा वरिष्ठ स्तरावर निर्णय घ्यावा, असा शेरा मारून फाईल शहर अभियंता विभागाकडे पाठविली आहे. दरम्यान महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी आता ही फाईल स्मार्ट … Read more

एसटीचे 12 कर्मचारी बडतर्फ तर 50 जण कामावर हजर

ST

औरंगाबाद – विलीनीकरणाच्या प्रमुख मागणीसाठी संपावर असलेल्या कर्मचार्‍यांवर एसटी प्रशासनाने कारवाईचे सत्र सुरूच ठेवले आहे. आतापर्यंत 21 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. काल त्यात आणखी भर पडली असून, पुन्हा 12 जणांवर बडतर्फीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे एकूण बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या 33 झाली आहे. तर काल गंगापूर, वैजापूर आणि सोयगाव या गावातील जवळपास 50 कर्मचारी कामावर … Read more

वंशाच्या दिव्यांना अंत्यसंस्कारापासून रोखले; मुलींनीच दिला आईला ‘खांदा’

औरंगाबाद – देवाचे रूप असलेल्या आईला तिच्या पोटच्या गोळ्यांनीच वीस वर्षांपूर्वी घराबाहेर हाकलून दिले. तेव्हा ‘त्या’ आईला आधार दिला, तो मुली व जावयांनी. अखेर वृद्धापकाळाने शनिवारी त्या आईने जगाचा निरोप घेतला. तिच्या अंत्यसंस्कारालादेखील तीन मुलांपैकी दोघांनी फक्त पाहुण्यांसारखी हजेरी लावल्याने, संतप्त लेकींनी त्या दोघांनाही आईच्या मृतदेहाला हात लावू दिला नाही. तिन्ही मुलींनी एका जाऊबाईच्या मदतीने … Read more

आजपासून 15 ते 18 वयोगटातील लसीकरणाचा शुभारंभ; शहरात ‘या’ केंद्रांवर मिळणार लस

औरंगाबाद – केंद्र सरकारने आज पासून 15 ते 18 वयोगटातील तरुणांना कोरोना प्रतिबंध लस देण्याचे जाहीर केले. या लसीकरणाचा शुभारंभ सकाळी 10:30 वाजता महापालिकेच्या प्रियदर्शनी विद्यालयात पालक मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे. महापालिकेने शहरातील सहा केंद्रांवर लस देण्याची व्यवस्था केली आहे. 15 ते 18 या वयोगटातील 69 हजार 998 जन असावेत असा अंदाज … Read more

तूर्तास लॉकडाऊन नाही, पण…

Rajesh Tope

औरंगाबाद – राज्यात लॉकडाउन सध्या नाहीच या बाबत कुणीच अफवा पसरवू नये, भीती ही दाखवू नये तूर्तास लॉकडाऊन लागणार नाही. पण जेव्हा 700 मेट्रिक टन पेक्षा जास्त ऑक्सिजन लागले की ऑटोमोडमध्ये लॉकडाउन लागेल असे टोपे म्हणाले. राज्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या आकडेवारीबद्दल आणि निर्बंधाबद्दल आज राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहीती दिली आहे. ते आज … Read more

गुंठेवारीला आता ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

औरंगाबाद – गुंठेवारी अधिनियमानुसार शहरातील बेकायदा मालमत्ता नियमित करण्यासाठी महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी आणखी एका महिन्याची मुदत दिली आहे. 31 जानेवारीपर्यंत मालमत्ताधारकांना फायली दाखल करता येतील. मात्र, व्यावसायिक बेकायदा मालमत्तांना ही शेवटची संधी असेल, असा इशारा पांडेय यांनी काल दिला. राज्य शासनाने गुंठेवारी अधिनियमात सुधारणा करत डिसेंबर 2020 पर्यंतची बेकायदा बांधकामे नियमित करण्याचा निर्णय … Read more

उद्यापासून 15 ते 18 वयोगटातील बालकांना लसीकरणासाठी करता येणार नोंदणी

औरंगाबाद – नवीन वर्षात 15 ते 18 वयोगटातील बालकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम हाती घेतली जाणार आहे. 3 जानेवारीपासून हे लसीकरण सुरु होणार असून याकरिता 1 जानेवारीपासून कोविन अ‍ॅपवर नाव नोंदणी करावी, असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच 10 जानेवारीपासून ज्येष्ठ नागरिकांना तसेच फ्रंटलाइन वर्कर्सना तिसरा बूस्टर डोस दिला जाणार आहे. लसीचा दुसरा … Read more

सावधान ! औरंगाबादेत पुन्हा वाढतोय कोरोना

Corona

औरंगाबाद – एकीकडे थंडीचा कडाका वाढत असताना दुसरीकडे कोरोना संसर्ग पाय पसरवत असल्याचे चित्र आहे. गेल्या दोन दिवसात तब्बल 30 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसांचा विचार करता या आकड्यामुळे आरोग्य विभागातर्फे चिंता व्यक्त केली जात आहे. शहरात कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत सुमारे 32 हजार तर दुसऱ्या लाटेत 40 हजार जणांना कोरोना संसर्गाची … Read more