नवीन वर्षात ‘या’ जिल्ह्यात अनेक निर्बंध लागू, कोणत्याही कार्यक्रमासाठी आता फक्त 50 जणांनाच परवानगी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली । सध्या राज्यात कोविड-19 विषाणूचा ओमायक्रॉन हा प्रकार झपाट्याने वाढत असल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात होणार प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी लग्न / विवाह समारंभासाठी बंदिस्त किंवा खुल्या जागेत, जास्तीत जास्त 50 व्यक्तीनांच उपस्थित राहण्यास परवानगी तसेच इतर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अथवा धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील बंदिस्त किंवा खुल्या जागेत जास्तीत जास्त 50 व्यक्तींनाच उपस्थित राहण्यास परवानगी असल्याचे जाहीर केले असून अंत्यविधी / अंत्ययात्रा बाबतीत उपस्थित व्यक्तींची संख्या 20 पर्यंत मर्यादित केल्याचे प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

हे नियम सांगली जिल्ह्यात 31 डिसेंबर रात्री 9 वाजल्यापासून अतिरिक्त निर्बंध लागू केले आहेत. राज्य शासनाकडूनप्रतिबंधात्मक आदेश पारीत केले आहेत. त्याअनुषंगाने या आदेशाची अंमलबजावणी पोलीस अधीक्षक, तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था व सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी करावी.

या आदेशाचे पालन करणार्‍या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडील दि. 29 नोव्हेंबर 2021 व दि. 25 डिसेंबर 2021 रोजीच्या आदेशामध्ये नमूद केल्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आदेश जिल्हादंडाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

Leave a Comment