चंदेरी दुनिया । बॉलिवूडच्या हॉट अभिनेत्रींपैकी एक म्हणजे मौनी रॉय. सध्या मौनी आपल्या मित्रपरिवारासोबत गोव्यात चिल करत आहे. गोव्याच्या बीचवरून मौनीनं काही हॉट फोटो शेअर केले आहेत जे सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. खास बात म्हणजे समोर आलेल्या नवीन फोटोंमध्ये नेहमीप्रमाणे मौनीचा हॉट अंदाज आणि सेक्सी एक्सप्रेशन दिसत आहेत.
मौनीनं कोणताही हॉट फोटो शेअर करायचा उशीर असतो की, तो क्षणातच व्हायरल होताना दिसतो. मौनी सोशल मीडियावर सुपरअक्टिव्ह असते. नेहमीच चाहत्यांसाठी ती आपले बोल्ड फोटो शेअर करत असते.
मौनी आपल्या बदलत्या लुकमुळे अनेकदा ट्रोल झाली आहे. परंतु लोकांच्या ट्रोलिंगकडे ती कधीच लक्ष देत नाही. तिनं अनेकदा ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे. तिचे काही व्हिडीओदेखील काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले होते.
मौनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर नुकतीच ती मेड इन चायना या सिनेमात दिसली होती. लवकरच आता मौनी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट सोबत ब्रह्मास्त्र या सिनेमात दिसणार आहे. गोल्ड या सिनेमातून तिनं बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. क्यों की सास भी कभी बहू थी या मालिकेतून तिनं आपल्या करिअरला सुरुवात केली होती. मौनी एक ट्रेन्ड कथ्थक डान्सर आहे.