मराठ्यांचं पाठबळ राष्ट्रवादीला तारणार का ? सकल मराठा समाजाचा राष्ट्रवादीला पाठींबा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर प्रतिनिधी । राज्य सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाने आज बहुजन विचाराच्या राष्ट्रवादी काॅग्रेसला विधानसभा निवडणूकीसाठी पाठींबा जाहीर केला आहे. सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी आज पंढरपुरमध्ये ही घोषणा केली.

मराठा आरक्षण प्रश्नावर सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाने राज्यभरात भाजप सरकार विरोधात रान उठवले होते. लोकसभा निवडणूकीत सकल मराठा समाजाने भाजप-शिवसेनेला विरोध केला होता. त्यानंतर आता विधानसभा निवढणूकीत ही सकल मराठा समाजाने राष्ट्रवादी काँग्रेसला पाठींबा जाहीर केला आहे. विधानसभा निवडणूकी संदर्भात राज्यातील प्रमुख पदाधिकार्याची बैठक येथील श्रीराम मंगल कार्यालयत पार पडली .या बैठकीत सर्वानुमते राष्ट्रवादीला पाठींबा जाहीर केला.

मराठा समाजाच्या या दोन संघटनांनी पाठींबा जाहीर केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकाकी पडलेली राष्ट्रवादी आपले अस्तित्व टिकाऊ शकेल का? या प्रश्नाचे उत्तर निवडणूक निकालच देतील. मात्र, आजघडीला जाहीर झालेला पाठिंबा राष्ट्रवादीला विश्वासपूर्ण दिलासा देणारा आहे.

इतर काही बातम्या-

 

 

 

Leave a Comment