विनायक मेटेंच्या ‘त्या’ मागणीवर काँगेस संतापली; केला जोरदार पलटवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरुन अशोक चव्हाण यांना हटवून एकनाथ शिंदे किंवा दुसऱ्या सक्षम मंत्र्याकडे उपसमितीचे अध्यक्षपद द्यावे, अशी मागणी विनायक मेटेंनी यांनी केली आहे. विनायक मेटेंच्या मागणीवर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी जोरदार पलटवार केलाय. सचिन सावंत यांनी ट्विटवर विनायक मेटेंचा चांगलाच समाचार घेतला. सचिन स्वतः म्हणाले कि, ‘मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण सर्वांना विश्वासात घेऊन पावलं उचलत आहेत. त्यांच्या सर्वसमावेशक आणि सावध भूमिकेमुळे मराठा आरक्षणाची बाजू भक्कम होत असून त्यामुळे छुपी कारस्थानं करणाऱ्या मेटेंच्या बोलवते धनी असलेल्या भाजपा नेत्यांच्या पोटात दुखू लागलं आहे.’

याशिवाय ‘आज मराठा आरक्षणावर कोणतीही स्थगिती नाही, तसंच वकीलही पूर्वीच्याच सरकारने नेमलेले आहेत. विनायक मेटे धादांत खोटे बोलत आहेत. जनतेची दिशाभूल ते फडणवीसांच्या इशाऱ्यावर करत आहेत. फडणवीसांच्या पायावर घालीन लोटांगण वंदिन चरण म्हणणाऱ्या मेटेंचा खरा भाजपाचा चेहरा मराठा समाज ओळखून आहे,’ अशी टीका सचिन सावंत यांनी केली आहे.

‘मराठा आरक्षणासाठी ५० बलिदाने होत असताना, उच्च न्यायालयात फडणवीस सरकारने शपथपत्र दाखल करण्यास ३ वर्ष लावली आणि शिवस्मारकात गैरव्यवहार सुरू असताना गप्प राहणाऱ्या खोटारड्या मेटेंनी मराठा समाजाचा विश्वास स्वत:च केव्हाचा गमावला आहे’, असंही सचिन सावंत ट्विटमध्ये म्हटलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment