हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी छत्रपती संभाजी यांच्या वतीने आज मराठा क्रांती मूक आंदोलनाला कोल्हापूर येथून सुरुवात करण्यात आली. छत्रपती खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले आहे. या आंदोलनात प्रकाश आंबेडकर आणि पालकमंत्री सतेज पाटीलही सहभागी झाले.
मुख्यमंत्र्यांची घेणार भेट
या आंदोलनाची सांगता झाल्यानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे परवा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी जाणार आहेत कोल्हापुरातील मूक आंदोलनाची सांगता झाल्यानंतर पुढील दिशा ठरवण्यासाठी समन्वयकांशी बैठक झाली. या बैठकीत संभाजी राजांनी मुख्यमंत्र्यांसोबत च्या बैठकीची माहिती दिली आहे.
आवाज दिल्लीपर्यंत जायला पाहिजे
दरम्यान श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यावेळी बोलताना म्हणाले की, मराठा आरक्षणाचा मुद्दा एकमताने हाताळण्यात पक्षात दुफळी करण्याकडे अनेकांचा प्रयत्न होता हा आवाज मुंबई पर्यंत पोहोचला आहे. आता आवाज दिल्लीपर्यंत जायला पाहिजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या भेटीमध्ये राज्य सरकार सकारात्मक असल्याचं सांगितलं. पुढे बोलताना ते म्हणाले आता केंद्र सरकारने पुढाकार घेतला तरच हा मुद्दा सुटू शकेल नवीन कायदा आणल्याशिवाय आता काही होणार नाही. मराठा समाज कोणकोणत्या ठिकाणी मागास आहे हे पाहिले पाहिजे. तेवढी याचिका दाखल करून उपयोग नाही यासाठी सर्व खासदार-आमदार समाजाने एकत्र यावं असं श्रीमंत छत्रपती शाहू महाराज बोलताना म्हणाले आहेत.