औरंगाबाद : मराठा ठोक मोर्च्याचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी येत्या 9 ऑगस्ट रोजी भव्य मोर्च्या काढणार असे सांगितले तत्पूर्वी 6 जून आणि 13 जुलै या दोन्ही दिवशी राज्यस्तरीय बैठका घेतल्या जातील आणि मोर्च्याचे नियोजन केले जाईल. या मोर्च्या दरम्यान आम्हाला जर पोलीस प्रशासनाने सहकार्य केले नाही तरीही मोर्च्या काढणार, असे रमेश केरे पाटील यांनी हॅलो महाराष्ट्रच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून मराठा समाजाच्या विविध संघटनेने मराठा आरक्षण आणि कोपर्डी या सारख्या अनेक मुद्द्याविरोधात मोर्चे काढले आहे.अनेक मराठा बांधवानी आरक्षणासाठी प्राणाची आहुती दिली आहे. या सर्व प्रलंबित मागण्यांसाठी विशाल मोर्चा काढण्याची तयारी मराठा संघटनेच्या वतीने सुरु आहे असल्याचे केरे यांनी स्पष्ट केले.
त्याच बरोबर साष्टपिपंळगावच्या आंदोलनाला 105 दिवस होऊनही सरकार आमच्याकडे लक्ष का देत नाही? असा प्रश्न केरे पाटील यांनी उपस्तित केला.