लातूर | मराठा आंदोलकांनी दिनांक १ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट लोकप्रतिनिधींच्या घरा बाहेर ठिय्या देण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पा नुसार मराठा आंदोलकांनी वसंतराव नाईक चौकातून मोर्चा काढून आर एस कॉलिनीतील संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घराकडे मोर्चा वळवला आणि विशिष्ठ अंतरावर लावलेले बॅरिगेस्ट कार्यकर्त्यांनी तोडून लावले. तेव्हा पोलिस आणि आंदोलकांच्यात बाचाबाची झाली. आंदोलक हिंसक रूपात असल्याने पोलिसांनी माघार घेतली आणि निलंगेकरांच्या घरा समोर आंदोलकांनी ठिय्या दिला.
मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकर सोडवण्याची मागणी केली. तर संभाजी पाटील निलंगेकर यांना मराठ्यांबद्दल कणव असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली