व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पत्र देत केली ‘ही’ महत्वाची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज ते पदभार स्वीकारण्यासाठी मंत्रालयात दाखल झाले. तत्पूर्वी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी त्यांना पत्रही दिले. “मराठा समाजाला ओबीसीतून मराठा आरक्षण मिळावे, मराठा आरक्षणाची पूर्तता करावी तसेच मराठा आरक्षणाचा प्रश्न तातडीने सोडवावा,” आदी महत्वाच्या मागण्या समन्वयकांनी केल्या.

एकनाथ शिंदे हे आज मंत्रालयात मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारण्यासाठी सकाळी दाखल झाले. यावेळी त्यांनी मंत्रालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. यावेळी मंत्रालयातील विविध विभागातील अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी त्यांना पूष्पगुच्छ देत स्वागत केले. यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकानी त्यांना एक पत्र दिले. त्यामध्ये त्यांनी मराठा आरक्षण प्रश्नी राज्यसरकारकडून संभाजीराजेंना जी आश्वासने देण्यात आलेली होती. त्याची आपण लवकरात लवकर पूर्तता करावी, अशी महत्वाची मागणी यावेळी समन्वयकांनी केली.

यापूर्वीही मराठा आरक्षण प्रश्नी मराठा क्रांती मोर्चाच्या वतने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागी करण्यात आली होती. दरम्यान संभाजीराजे छत्रपती यांनीही उपोषण करत सरकारला वेठीस धरले होते. त्यावेळी महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी त्यांची भेट घेत त्यांच्या मागण्यांची पूर्तता करू असे आश्वासन दिले होते. त्यानंतर आता मुख्यमंत्रीपदाची सूत्रे एकनाथ शिंदे यांनी स्वीकारल्यानंतर त्यांना मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वकांनी मागण्यांचे पत्र दिले.