मराठा समाजाच्या विरोधात निकाल गेल्यास महाराष्ट्रात उद्रेक; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी | येत्या 5 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर सुनावणी होणार आहे. यादिवशी न्यायालयाचा निकाल मराठा समाजाच्या विरोधात गेल्यास महाराष्ट्रात तीव्र स्वरूपाचा आंदोलन सुरू होऊन त्याचा महाराष्ट्रात उद्रेक होईल असा गंभीर इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजय सावंत यांनी दिला. आज औरंगाबाद येथे मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.

जिल्ह्यातील साष्ट पिंपळगाव येथे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्यासाठी आंदोलन सुरू आहे. तेथून 1 फेब्रुवारी रोजी मशाल रॅली काढण्यात येणार आहे त्या रॅलीचे समारोप औरंगाबादेतील क्रांति चौकात होणार असून त्यानंतर 1 फेब्रुवारी पासून क्रांति चौकात ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहितीही सावंत यांनी यावेळी दिली.

मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत समाजाने प्रखर लढा दिला असूनही राज्य शासनाने हा प्रश्न मार्गी लावला नाही. आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असताना सुद्धा शासनाने शासकीय नोकर भरतीचा घाट घातला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षणावरील स्थगितीमुळं एमपीएसी उत्तीर्ण झालेल्या समाजातील युवकांना नियुक्तीचे पात्र दिलेले नाही. त्यामुळं नोकर भरती रद्द करावी आणि येत्या 5 फेब्रुवारीला होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणीत मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवावी यासाठी आम्ही आंदोलन करणार असल्याचे सावंत यांनी यावेळी सांगितले.

आतापर्यन्त आम्ही शांततेची खूप आंदोलन केली. त्यानुसार केवळ ५ तारखेपर्यन्त आम्ही शांततेने आंदोलन करू. मात्र, मराठा आरक्षणाचा मुद्दा न सोडविल्यास येत्या ६ तारखेनंतर महाराष्ट्रात तीव्र आंदोलन होईल. आणि ते आवरणे राज्य सरकारला कठीण होईल अशी चेतावनी सावंत यांनी यावेळी दिली.

जातीवाचक मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा!
विजय वेडट्टीवार आणि छगन भुजबळ हे सातत्यानं ओबीसी आणि मराठा समाजात भांडण लावत आहेत. या मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. आणि त्यांना समाजाच्या कामासाठी मुक्त करावं अशी मागणीही स्वतः यांनी यावेळी केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

Maratha Reservation | निकाल मराठा समाजाच्या विरोधात गेल्यास महाराष्ट्रात उद्रेक-मराठा क्रांती मोर्चा

Leave a Comment