सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
मराठा आरक्षण आंदोलनावेळी झालेल्या दंगली प्रकरणी युवकांवरील गुन्हे मागे घ्यावेत. अशी मागणी आमदार शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यात विविध ठिकाणी आंदोलने झाली होती. या प्रकरणात मराठा युवकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्याने त्यांना त्रास होत आहे. ते गुन्हे मागे घ्यावेत यासाठी शिवसेनेचे आमदार शंभूराजे देसाई आता पुढे सरसावले आहेत
महाराष्ट्रात राज्यातील सकल मराठा समाजाला आरक्षण मुळे संदर्भात विविध पक्षांचे व संघटनाचा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी शांततेच्या मार्गाने आंदोलने केली होती. या आंदोलनामध्ये सकल मराठा समाजातील सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल झाले आहेत.
राज्यातील मराठा समाजाला त्यांच्या मागणीप्रमाणे आरक्षण मिळवून देण्यासंदर्भात केलेल्या आंदोलनामुळे या सर्वपक्षीय सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे त्यांना त्रास होत आहे. ते गुन्हे मागे घ्यावेत अशा आशयाचं पत्र सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्याचे आमदार शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिले आहे.