Monday, January 30, 2023

मराठा आरक्षण टिकणार ? उद्या सुप्रीम कोर्ट देणार ऐतिहासिक निकाल

- Advertisement -

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टत आव्हान देण्यात आले होते. त्यावर आता सुप्रीम कोर्ट उद्या ऐतिहासिक निर्णय देणार आहे. उद्या सकाळी मराठा आरक्षणावर सुनावणी करण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

- Advertisement -

तत्कालीन फडणवीस सरकारने दिलेलं मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरी आरक्षण मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवले होते. पण या विरोधात काहींनी सुप्रीम कोर्टात धाव घेत आपली याचिका दाखल केली होती. त्यानंतर मराठा आरक्षणाला स्थागिती देण्यात आली होती. न्या. अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली ५ न्यायाधीशांचे घटनापीठ हा ऐतिहासिक निकाल सुनावणार आहेत.