Maratha Tourist Train : गडकिल्ल्यांना जोडणारी मराठा पर्यटन ट्रेन; कधी आणि कुठून सुरु होणार?

Maratha Tourist Train
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Maratha Tourist Train । महाराष्ट्र हि छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी… शिवराय हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत… तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले हा तमाम मराठी माणसांसाठी आत्मसन्मानाचा एक भाग.. अनेक जण महाराजांच्या गडकिल्ल्यांची मोहीमा काढतात, ट्रेकिंग करतात, पण आता महाराष्ट्रातील हे सर्व किल्ले एका रेल्वेने जोडण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्याने जोडणारी मराठा पर्यटन ट्रेन लवकरच सुरु होणार आहे. रायगड, शिवनेरी, पन्हाळा, प्रतापगड सोबतच सांस्कृतिक आणि धार्मिक स्थळांनाही या ट्रेनच्या माध्यमातून जोडण्यात येणार आहे. हि ट्रेन कधी सुरु होणार आहे? या ट्रेनच्या माध्यमातून कोणकोणत्या गडकिल्ल्यांची मोहीम करता येणार आहे ते आपण सविस्तर जाणून घेऊयात……

आयआरसीटीसी’द्वारा संचालित भारत गौरव टुरिस्ट ट्रेन ही विशेष मराठा पर्यटन उपक्रमांतर्गत मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाचा लाभ देशभरातील रेल्वे प्रवाशांना घेता येणार आहे. हि मराठा पर्यटन ट्रेन येत्या ९ जूनपासून सुरू होणार आहे. या विशेष ट्रेनने महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांचा, सांस्कृतिक ठेव्यांचा आणि धार्मिक स्थळांचा प्रवास करणे पर्यटकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरेल यात शंकाच नाही.

कोणकोणत्या गडकिल्यांचा समावेश? Maratha Tourist Train

गडकिल्ल्यांना जोडणारी मराठा पर्यटन ट्रेन हि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स तसेच दादर आणि ठाणे स्थानकावरून ९ जूनला सुटणार आहे. यामध्ये किल्ले रायगड, पुणे परिसरातील लाल महाल, कसबा गणेश मंदिर, शिवसृष्टी, किल्ले शिवनेरी, भीमाशंकरचे ज्योतिर्लिंग मंदिर, किल्ले प्रतापगड, कोल्हापूरची अंबाबाई मंदिर आणि किल्ले पन्हाळगड या स्थळांचा समावेश आहे.

मराठा पर्यटन ट्रेन यात्रेच्या (Maratha Tourist Train) अंतर्गत, पर्यटन प्रेमींना एक विशेष यात्रा पॅकेज देखील दिले जाणार आहे, ज्यात संपूर्ण प्रवासाची व्यवस्था, निवास, भोजन, तसेच स्थानिक मार्गदर्शकांची सेवा उपलब्ध असेल. या पॅकेजमध्ये विविध किल्ल्यांची आणि तीर्थस्थळांची सुसंगत माहिती दिली जाईल, ज्यामुळे पर्यटकांना एक संपूर्ण ऐतिहासिक अनुभव मिळेल.