मराठवाड्याच्या वाट्याला आली ६ मंत्रिपद, मंत्रीपदी यांची लागली वर्णी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात मराठवाड्याच्या वाट्याला सहा मंत्रिपद आली आहेत. महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांनी प्रत्येकी दोन जणांना मंत्रिपदाची संधी दिली आहे. यातील काँग्रेसकडून मोठं नाव म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच असून, माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख यांनी पहिल्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीकडून मराठवाड्यातून अपेक्षेप्रमाणे धनंजय मुंडे याना संधी देत त्यांना कॅबिनेट मंत्रिपद बहाल केलं. तसेच राष्ट्रवाडीकडून राजेश टोपे हे मंत्रिपदाची शपथ घेतलेले मराठवाड्यातील दुसरे मंत्री ठरले.

शिवसेनेकडून पैठणचे आमदार संदीपान भुमरे आणि काँग्रेस सोडून सेनेत समिलं होतं निवडून आलेले आमदार अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान दिलं आहे. संदीपान भुमरे यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली असून, अब्दुल सत्तार राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचं सरकार महिनाभरापूर्वी सत्तेत आलं. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर त्यांच्याबरोबर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या प्रत्येकी दोन नेत्यांनी मुख्यमंत्रीपदाची मंत्रिपदाची शपथ घेतली होती.

Leave a Comment