Monday, February 6, 2023

परत माझ्या बाबांसोबत डान्स केलास तर..; अंशुमनच्या लेकीचा अभिनेत्रींना दम, पहा हा गोड व्हिडीओ

- Advertisement -

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या इंडट्रीमध्ये अनेक स्टारकिड्सचा दंगा आहे. बॉलिवूडमध्ये तर अ आ इ बोलता ना येणाऱ्या स्टारकिड्सचा पण मोठा चाहता वर्ग आहे. त्याचप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीतसुद्धा अनेक स्टार किड्स असेच चर्चेत आहेर्त. त्यातील एक म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता अंशुमन विचारेची लाडकी लेक अन्वी. ती सुद्धा बऱ्याचदा तिच्या गोड गोड बालक्रीडांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असते. सोशल मीडियावरील तिचे अनेक व्हिडीओ वायरल होत असतात. मात्र यावेळी अन्वीचा तर पाराच चढला आहे. नुकताच तिचा एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओत ती आपल्या वडिलांनी म्हणजेच अंशुमनने कोणत्याही अभिनेत्रीसोबत डान्स करायचा नाही, असे दमदाटी करून सांगताना दिसतेय तर ज्या अभिनेत्रीने त्याच्यासोबत डान्स केला तिची धुलाई करेन असेही म्हणतेय.

- Advertisement -

अभिनेता अंशुमन विचारे सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. यामुळे अनेकदा तो त्याची लेक अन्वी हिचे फोटो आणि वेगवेगळे व्हिडीओ शेअर करत असतो. तिचे कित्येक व्हिडीओ बऱ्याचदा सोशल मीडियावर वायरल सुद्धा होतात. नुकताच त्याने अन्वीसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. यासोबत कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, ‘माझं काही खरं नाही, कुठल्याच हिरोईनसोबत डान्स करायचा नाही’, असं अन्वीने बजावले आहे. फुल्ल राडे, माझी आई. या व्हिडीओत अन्वी अंशुमनला ज्या अभिनेत्रीसोबत डान्स केला तिला व्हिडीओ कॉल कर असे सांगते आहे. त्यावर तिची आई माझ्याकडे नंबर नाही असे म्हणतेय.

इतकेच नव्हे तर या व्हिडिओत चिमुकली नवी म्हणतेय, माझ्या बाबासोबत परत डान्स केला तर तिची धुलाई करेन. त्यावर आई म्हणाली की आपले बाबा कलाकार आहेत. तरीही अन्वी म्हणते, कुणीही बाबासोबत डान्स करायचा नाही. जर तुम्ही तिला व्हिडीओ कॉल लावू शकत नाही तर चला तिच्या घरी जाऊयात, असा हट्टही धरला आहे.

अन्वी म्हणते, आईसोबत डान्स केला तर चालेल. मात्र इतर कोणासोबत त्याने डान्स करायचा नाही आणि कोणत्या अभिनेत्रीपण त्याच्यासोबत डान्स करायचा नाही. नाहीतर तिची काही खैर नाही, असे ती सांगताना दिसते आहे. तिचा हा मजेशीर आणि गोड धमकीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतो आहे.