हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रवी पटवर्धन यांनी अनेक मराठी नाटकं, चित्रपट आणि मालिकांमध्ये काल केलं आहे. स्टार प्रवाह वरील ‘अगंबाई सासूबाई’ ही रवी पटवर्धन यांची शेवटची मालिका ठरली. त्यांच्या निधनामुळे नाटकासह सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
सध्या ते झी मराठीवरील ‘अगंबाई सासूबाई’ या मालिकेतील आशुतोष पत्की म्हणजेच, सोहमच्या आजोबांची भूमिका साकारत होते. फार कमी वेळातच रवी पटवर्धन यांनी साकरलेल्या या मालिकेतील आजोबांच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं होतं. लाडावलेल्या सोहमला धाकात ठेवणारे आजोबा… आणि नातवाला ‘सोम्या… कोंबडीच्या’ असं म्हणणारे ‘दत्तात्रय बंडोपंत कुलकर्णी’ या भूमिकेतील रवी पटवर्ध यांच्यावर अख्या महाराष्ट्राने भरभरून प्रेम केलं.
रवी पटवर्धन यांचा जन्म o6 सप्टेंबर 1937 रोजी झाला. भारदस्त व्यक्तिमत्त्वाला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळे ते प्रसिद्ध होते. रवी पटवर्धन यांनी आतापर्यंत जवळपास 150 हून अधिक नाटक तर 200 हून अधिक चित्रपटात काम केले आहे. त्यांच्या या सर्वच चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या.
वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी भगवद्गीतेचे 700 श्लोक पाठ केले. त्यानंतर ते शृंगेरी मठाच्या परीक्षेला बसले. यावेळी शंकराचार्यांनी घेतलेल्या त्या परीक्षेत रवी पटवर्धन पहिले आले होते. रवी पटवर्धन यांनी आईची सेवा करता यावी यासाठी लग्न केले नाही.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’