पालघरच्या घटनेनं सुबोध भावे कमालीचा अस्वस्थ, ट्विटरद्वारे मोकळया केल्या भावना, म्हणाला…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातल्या गडचिंचले येथे जमावाकडून ३ जणांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर दोन दिवसांनी त्या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या घटनेविरोधात सर्वच स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पालघरच्या घटनेनं मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे खूपच अस्वथ झाला आहे. सुबोध भावे याने ट्विटरच्या माध्यमातून आपली अस्वस्थता व्यक्त केली आहे.
पालघर झुंडबळीची घटना अस्वस्थ करणारी आहे असं ट्विट अभिनेता सुबोध भावे याने केलं. असं पुन्हा कुठेच घडू नये म्हणून आपण सर्वांनी सिद्धा राहायला हवं, असं आवाहनसुद्धा त्याने केलंय. सुबोधने त्याच्या ट्विटमध्ये लिहिलं, “अफवा आणि गैरसमज कुठल्या थरापर्यंत जातात याचं उदाहरण म्हणजे पालघरची घटना. जीव गमवावा लागलेल्या जीवांना भावपूर्ण श्रद्धांजली. जमावाला विचार नसतो आणि कृतीला दिशा नसते हे पुन्हा सिद्ध झालं. असं पुन्हा कुठेच घडू नये म्हणून आपण सर्वांनी सिद्ध राहायला हवं. अस्वस्थ घटना.”

पालघर प्रकरणात १०० पेक्षा जास्त लोकांना अटक केली आहे. यामध्ये नऊ मुलं अल्पवयीन आहेत त्यांना सुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. तसंच या प्रकरणातल्या पाच म्होरक्यांनाही अटक केली आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. तसेच या प्रकरणात हलगर्जीपणाचा ठपका ठेवत कासा पोलीस ठाण्याच्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews”

Leave a Comment