Wednesday, March 29, 2023

हॅपी बर्थडे आर्ची..! साधीभोळी रिंकू झाली अल्पावधीतच ग्लॅमरस; मोठ्या मेकओव्हर नंतर बॉलिवूडमध्येही पदार्पण

- Advertisement -

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपटसृष्टीत अश्या अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांची स्वप्न अतिशय खडतर प्रवासातून होरपळत पूर्ण झाली आहेत. काहींची स्वप्न तर अजूनही प्रगती पथावर आहेत. अशीच आणखी एक अभिनेत्री जिचं वय आणि अनुभव नक्कीच कमी आहे पण स्वप्न लहानपणापासूनच मोठी आणि ती पूर्ण करण्यासाठीची जिद्द तिने उराशी कायम बाळगली. सैराट चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनमानावर राज्य करणारी आर्ची अर्थात लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरु हिचा आज २०वा वाढदिवस आहे. लहानपणापासूनच नृत्य आणि अभिनयाची आवड असलेली रिंकू आर्ची म्हणून प्रेक्षकांसमोर आली आणि तिने आपल्या हटके बोली आणि अलग अंदाजाने प्रेक्षकांना अगदी भुरळच पाडली. आज तिचा वाढदिवस म्हणून सोशल मीडियावर तिचे चाहते मोठ्या संख्येने तिला शुभेच्छा देताना दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/CPpJLATphHr/?utm_source=ig_web_copy_link

- Advertisement -

रिंकू राजगुरू हिने मराठी चित्रपटसृष्टीवर जादू केलीच पण ती आता हिंदी चित्रपटसृष्टीतही आपले नशीब आजमावत आहे. सैराटनंतर रिंकूला सिनेइंडस्ट्रीमध्ये तुफान प्रसिद्धी मिळाली होती. पण आता आधीसारखी राहिली नाही. तिच्यात फार मोठा बदल झाला आहे. म्हणजे असं कि, रिंकू आधीपेक्षा आता अतिशय ग्लॅमरस झाली आहे.

https://www.instagram.com/p/CPfIlDapqPY/?utm_source=ig_web_copy_link

अगदी कमी वयातच रिंकूने भलं मोठं यश संपादन केलं. यासोबतच रिंकूने तिच्या लुकवरही अधिक लक्ष देत बरीच सुधारणा केली आहे. पूर्वीपेक्षा निश्चितच तिच्यात अनेक बदल झाले आहेत. तसेच ती स्वतःला अधिकाधिक फिट करण्याचा नेहमीच प्रयत्न करत आहे. रिंकूच आत्ताचा लूक अगदी इतर आघाडीच्या अभिनेत्रींना टक्कर देणारा आहे.

https://www.instagram.com/p/CNtz-k1pWcb/?utm_source=ig_web_copy_link

 

रिंकूने सैराट नंतर ‘कागर’, ‘मेकअप’ या मराठी चित्रपटांत काम केले. मात्र ते बॉक्स ऑफिसवर फार यशस्वी होताना दिसले नाहीत. त्यानंतर रिंकूने तिचे गुरू नागराज मंजूळे यांचाच ‘झुंड’ हा बॉलिवूड चित्रपट साईन केला आहे. मात्र अद्याप तो प्रदर्शित झालेला नाही. त्यात ती बॉलिवूड दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणार आहे.

https://www.instagram.com/p/CMThg68Jq_V/?utm_source=ig_web_copy_link

मागील वर्षी ती ‘हंड्रेड’ या वेबमालिकेत दिसली होती. त्यात तिने बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता हिच्यासोबत काम केलं होतं. यातील तिच्या कामाचं कौतुकही झालं होतं. रिंकू झुंड चित्रपटातूनच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होती. मात्र तो चित्रपट प्रदर्शित न झाल्याने तिने वेबसीरिजमधूनच पदार्पण केले.

https://www.instagram.com/p/CPXkMd9p_Iv/?utm_source=ig_web_copy_link

शिवाय रिंकू ‘आठवा रंग प्रेमाचा’ या मराठी चित्रपटातही झळकणार आहे. रिंकूने काही जाहिरातींमध्येही काम केले आहे. रिंकूचा नवा मेकओव्हर लुक तिच्या चाहत्यांना चांगलाच पसंत पडत आहे. तसेच रिंकू सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. त्यामुळे ती नेहमीच स्वतःचे विविध फोटो आणि व्हिडीओ आपल्या चाहत्यांसह सोशल मीडियावर शेअर करत असते.