‘या’ मराठी अभिनेत्र्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश

सातारा । मराठी सिनेश्रुष्टीतल्या काही कलाकारांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी युवक कांग्रेसचा मेळावा आज महाबळेश्वर येथे झाला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित मराठी कलाकारांचा पक्षप्रवेश पार पडला.

राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागांमध्ये झी मराठीवरील गाजलेल्या सिरीयल मधल्या कलाकारांनी पक्षप्रवेश केला. अभिनेत्री अस्मिता देशमुख, दिग्दर्शक डॉ शशिकांत डोईफोडे,अभिनेत्री पुष्पा चौधरी,अभिनेते अंकुश मांडेकर, तसेच एक मराठा लाख मराठा सिनेमा चे दिग्दर्शक गणेश शिंदे, अभिनेत्री आलिया घिया, अभिनेत्री डिंपल चोपडे या सर्वांनी आज आदरणीय खासदार सुप्रिया ताई सुळे, राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थिती मध्ये प्रवेश केला.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने आयोजित युवक पदाधिकाऱ्यांच्या तीन दिवसीय चेतना शिबीराचे उद्घाटन आज महाबळेश्वर येथे झाले. ‘आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण : यशवंतराव चव्हाण ते शरदराव पवार’ या विषयावर खा. श्रीनिवास पाटील यांनी राज्यभरातून आलेल्या युवक पदाधिकाऱ्यांना संबोधित केले.

You might also like