मदर्स डे स्पेशल; मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर साजरा केला जागतिक मातृदिन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज मे महिन्यातील दुसरा रविवार आहे. आजचा दिवस आंतराष्ट्रीय पातळीवर जागतिक मातृदिन म्हणून साजरा केला जातो. आईविना अस्तित्व ते काय? या भावनेची किंमत इतर कोणत्याच बाबींसोबत केली जाऊ शकत नाही. आपल्या आयुष्यात आईचे स्थान इतर कोणाहीपेक्षा महत्त्वाचे असतेच. आज याच भावना व्यक्त करण्याचा दिवस आहे. आज अनेकजण आपापल्या आईला काही ना काही गिफ्ट देऊन शुभेच्छा देत असतात. तसेच या बाबतीत आपले कलाकार मंडळी काही मागे नाहीत. आजच्या खास दिवसाचे औचित्य साधून त्यांनी आपल्या आईंसोबतचे विविध फोटो शेअर करीत चाहत्यांनाही मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

https://www.instagram.com/p/COo1D5QHagK/?utm_source=ig_web_copy_link

सध्या डिजिटल युग आहे. त्यामुळे सोशल मीडियावर फोटो शेअर केल्याशिवाय कोणताही खास दिवस पूर्ण होत नाही. त्यामुळे तुमच्या-आमच्यासह आपल्या मराठमोळ्या कलाकारांनी देखील मातृदिनानिमित्त आईसोबतचे फोटो शेअर केले आहेत. धकधक गर्ल माधुरी दीक्षितने आपल्या आईसोबतचा फोटो शेअर करीत म्हटले आहे कि, मी खूप काही माझ्या आईकडून शिकलेय आणि आजही प्रत्येक दिवशी काही ना काही शिकतेय.

https://www.instagram.com/p/COo9MFCMzUa/?utm_source=ig_web_copy_link

तर अभिनेत्री क्रांती रेडकरने आपल्या आईचा एक फोटो शेअर करीत त्यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘मला माहित आहे जेव्हा कोणी माझ्याकडे पहात नाही .. तू आहेस !! आजपर्यंत तू जे काही केलया त्या सगळ्यासाठी खूप धन्यवाद. तुझ्यासारखं कमीतकमी ५ टक्के होण्यासाठी दररोज अथक प्रयत्न करावे लागतात. मातृ दिवसाच्या शुभेच्छा मोमीता.

https://www.instagram.com/p/COpAfgwDwDk/?utm_source=ig_web_copy_link

अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने आता स्वतः आईपणाची प्रवास सुरु केला असताना होणाऱ्या जाणिवेतून व्यक्त होणारी पोस्ट केली आहे. तिने आपल्या आईसोबतचा फोटो शेअर करताना लिहिले आहे कि, ‘जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे’ तुझ्याविषयी प्रेम आणि आदर आहेच, पण आता तु ज्या प्रवासातून गेलीय, त्या मार्गावरुन जाताना, तुझं आणखी महत्व कळतंय! आया लोक महान असतात. मातृदिनाच्या सर्वाना शुभेच्छा!

https://www.instagram.com/p/COo5ljJrZo3/?utm_source=ig_web_copy_link

तसेच मिथिला पालकरनेही आपल्या चाहत्यांना एक गोड फोटो शेअर करीत शुभेच्छा दिल्या आहेत. तर अभिनेता सुबोध भावेनेही आपल्या आईसोबतचा फोटो शेअर करीत मातृदिनाच्या हार्दिक शुभेछया दिल्या आहेत.

https://www.instagram.com/p/COpO2dJhiGh/?utm_source=ig_web_copy_link

 

अभिनेत्री रुपाली भोसलेनेही आपल्या आईविषयी व्यक्त होत आईसोबतचा फोटो शेअर करताना जगातील सर्व मातांना शुभेच्छा दिल्या आहेत. सोबत लिहिले कि, आई खूप स्पेशल असतात, असा एखादा दिवस त्यांच्यावरील प्रेमाचा वर्षाव किंवा त्यांच्याबद्दलच्या भावना नाही दर्शवू शकत. हा एक फक्त दिवस आहे व्यक्त होण्यासाठी आखलेला.

https://www.instagram.com/p/COo5rPaDbOH/?utm_source=ig_web_copy_link

मराठी प्रेक्षकांच्या लाडक्या सिद्धार्थ जाधवनेही आपल्या आईंसोबतचा फोटो शेअर करीत मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत.

https://www.instagram.com/p/COo_7s2Fcrd/?utm_source=ig_web_copy_link

तर मंडळी आपणही आजचा दिवस व्यक्त होण्याकरिता साजरा करा. आपली आई आपलं विश्व असते. तिच्यासाठी आपल प्रेम आणि तिच्याविषयी वाटणारा आदर हा असतोच. पण हे प्रेम आणि आदर एखाद्या दिवशी व्यक्त करायला हरकत तरी काय आहे? तर चला आजच्या दिवशी ते व्यक्त करुया. आईला छानशी मिठी मारुन मातृदिनाच्या शुभेच्छा देऊया.

Leave a Comment