हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मराठी माणसाला अभिमान वाटेल अशी एक चांगली बातमी नुकतीच समोर आली आहे. आज मराठी भाषेला (Marathi Language) अखेर अभिजात भाषेचा (Classical Language) दर्जा जाहीर करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच मराठी भाषेला अभिजात दर्जा देणार असल्याची घोषणा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आली होती. अखेर आज याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे.
आज मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी शासकीय आदेशाची अधिसूचना केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांनी मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपूर्द केली आहे. यासाठी उदय सामंत राजधानी दिल्लीला गेले होते. त्यामुळे आता अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली मराठी भाषा ही सातवी भाषा झाली आहे. यापूर्वी सात भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे.
महत्वाचे म्हणजे, अभिजात भाषेच्या दर्जामुळे मराठी भाषेच्या जतनासाठी आणि प्रचारासाठी सरकारकडून विशेष निधी उपलब्ध होणार आहे. यासह मराठी संशोधनाला चालना मिळणार मिळून भाषेचा शैक्षणिक आणि सांस्कृतिक वारसा आणखीन पुढे जाईल. दरम्यान, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जाणार असल्याची फक्त घोषणा करण्यात आल्यामुळे विरोधकांकडून याच्यावर जोरदार टीका केली जात होती. अखेर आज अध्यादेश काढत सरकारने विरोधकांची तोंडे बंद केली आहेत.