‘चिंतन एका मनस्विनीचे’ या पुस्तकाचे चंद्रपुरात प्रकाशन
चंद्रपूर प्रतिनिधी
धर्म व जातीने विखुरलेल्या समाजव्यवस्थेला विधायक वळण देण्याचे काम राजकारण्यांसाठी तसे कठीण असते. लेखक विचारवंतच हे काम अगदी निष्ठेने करू शकतात. विवेकी लेखक मंडळी सत्तेला उभे करतात आणि कोसळवू शकतात. जया द्वादशीवार यांनी महाराष्ट्रातील राजकारणाच्या डोळ्यात अंजन घालणारे लेखन केले आहे, असे प्रतिपादन भारताचे माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी केले. डॉ. जया द्वादशीवार लिखित ‘चिंतन एका मनस्विनीचे’ ग्रंथाच्या प्रकाशनाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
‘चिंतन एका मनस्विनीचे’ या पुस्तकातून देशातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक घटना आणि साहित्य कलाकृतींची अत्यंत गांभिर्याने चिकित्सा केली आहे. महाराष्ट्रला लेखक-पत्रकारांची फार मोठी परंपरा लाभली आहे. राजकीय नेतृत्व चुकत असेल तर त्यांचे कान धरण्याचे काम पत्रकारांचे आहे. निवडणुकीची धामधूम सुरू असताना सोलापूर येथून मी चंद्रपुरात आलोय. माझा दिवस वाया गेला नाही. या कार्यक्रमातून मी प्रेरणा घेऊ न चाललो आहे, असेही माजी गृहमंत्री शिंदे म्हणाले. द्वादशीवार कुटुंबीयांतर्फे डॉ. प्रकाश आमटे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, माजी आमदार गिरीश गांधी, माजी मंत्री शोभा फडणवीस, राजुराचे नगराध्यक्ष अरूण धोटे, डॉ. रजनी हजारे, आदींसह चंद्रपूर व नागपुरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
जया द्वादशीवार यांच्या ग्रंथावर विनोद शिरसाठ व डॉ. श्रीकांत तिडके यांनी भाष्य केले. समग्र लेखन अत्यंत प्रगल्भ विचारांचे निदर्शक असून माहिती व भाष्य यातून जयातार्इंचे चिंतन सुरू होते. ‘जमिनीवर पाय ठेवणारी लेखिका’ अशी नोंद शिरसाट यांनी केली. स्त्री लेखिकांची अभिव्यक्ती, आशय कडक असावी. मराठी स्त्री साहित्यात धीटपणा नाही, असा निष्कर्ष लेखिकेना मांडला तो वास्तवदर्शी असल्याचे डॉ. तिडके यावेळी म्हणाले.
लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra
इतर महत्वाचे –
लोकसभेत वामनराव चटप ठरणार किंगमेकर
हंसराज अहिर यांच्या विरोधात काँग्रेसकडून हे तीन उमेदवार शर्यतीत?