Marathi Movie : महाराष्ट्र दिनी 107 हुतात्म्यांना वंदन करून ‘संयुक्त महाराष्ट्र’ची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Marathi Movie) काल १ मे रोजी संपूर्ण राज्यभरात ‘महाराष्ट्र दिन’ साजरा केला गेला. दिनांक १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला होता. त्यामुळे १ मे रोजी ‘महाराष्ट्र दिन’ साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. १९६० रोजी झालेल्या मुंबई राज्याच्या विभाजनापासून ‘महाराष्ट्र दिन’ हा सामान्यतः परेड आणि राजकीय भाषणे तसेच समारंभांशी संबंधित सोहळा म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे कामगार वर्गाच्या आयुष्यात विशेष असे स्थान आहे.

कारण, १ मे याच दिवशी कामगार दिन देखील साजरा केला जातो. त्यामुळे हा दिवस कामगारांसाठी अधिकृत सुट्टी म्हणून साजरा केला जातो. ही तारीख कामगारांना त्यांच्या हक्कांसाठी आणि सद्य कामाच्या परिस्थितीसाठी केलेल्या संघर्षाला श्रद्धांजली वाहण्यासाठी जागतिक स्तरावर स्मरणात ठेवली जाते. (Marathi Movie) संयुक्त महाराष्ट्रासाठी इंग्रजांविरुद्ध अनेकांनी बंड पुकारले, चळवळी झाल्या. मात्र स्वातंत्र्योत्तर काळातील ही चळवळ विशेष आणि वेगळी ठरली. जिच्याविषयी जाणकारांनी अधिक माहिती प्रदान करण्यासाठी नुकतीच एका सिनेमाची घोषणा केली आहे.

‘संयुक्त महाराष्ट्र’ सिनेमाची घोषणा (Marathi Movie)

स्वतंत्र भारतात मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ’ हा लढा उभारण्यात आला होता. ही चळवळ भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळातील महाराष्ट्राच्या आतापर्यंत झालेल्या सर्व चळवळीतील एक प्रमुख चळवळ होती. आजवर झालेल्या अनेक चळवळी या इंग्रजांविरोधातील होत्या. मात्र ही चळवळ वेगळी होती. या चळवळीमुळे देशाचे राजकारण कोलमडले आणि १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. (Marathi Movie) त्यामुळे या खास दिनाचे औचित्य साधून कल्याणी पिक्चर्स आणि अभिता फिल्म्स प्रस्तुत ‘संयुक्त महाराष्ट्र’ या चित्रपटाची घोषणा केली आहे.

पॅावर वर्सेस प्राईड

कल्याणी पिक्चर्स आणि अभिता फिल्म्स प्रस्तुत ‘संयुक्त महाराष्ट्र’ या सिनेमाची ‘पॅावर वर्सेस प्राईड’ अशी टॅगलाईन आहे. या सिनेमाचे निर्माते सुनील शेळके आहेत. माहितीनुसार, हा सिनेमा २०२५ साली प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अद्याप या चित्रपटातून कोणकोणते कलाकार कोणकोणत्या भूमिकेत दिसणार याबाबतची सर्व माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे.

(Marathi Movie) दरम्यान आपल्या आगामी चित्रपटाबद्दल बोलताना निर्माते सुनील शेळके म्हणाले की, ‘ही चळवळ आजवरची संयुक्त महाराष्ट्राची सर्वात मोठी चळवळ होती. राजकीय, साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक अशा सगळ्याच बाजुने ही चळवळ होती. चित्रपटात हेच दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे’.