मराठी साहित्य परिषदेतर्फे रंगणार नवोदितांचे साहित्य संमेलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । मराठी साहित्य परिषदेतर्फे सांगलीत भावे नाट्यगृहात रविवारी नवोदितांचे साहित्य संमेलन आयोजित केले आहे. परिसंवाद, काव्य संमेलन, पुस्तक प्रकाशन, पुरस्कार वितरण असे त्याचे स्वरूप आहे. स्वागताध्यक्ष डॉ. जयश्री पाटील व परिषदेचे अध्यक्ष शरद गोरे यांनी ही माहिती दिली. संमेलनाचे हे २८ वे वर्ष आहे.

कोरोनास्थितीमुळे नाट्यगृहाच्या क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीत कार्यक्रम होतील. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी लेखिका सुवर्णा पवार आहेत. प्रसिद्ध वक्ते इंद्रजीत देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. सकाळी ग्रंथ दिंडी निघेल. त्यानंतर विविध क्षेत्रातील नामवंतांना पुरस्कार प्रदान केले जातील. यामध्ये उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक संध्याराणी देशमुख, सामाजिक कार्यकर्ता सुधीर गवळी, तासगाव, लेखक नामदेव राठोड आदींचा समावेश आहे.

दुपारच्या सत्रात परिसंवाद होईल. साहित्य चळवळ आणि समाजाचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन या विषयावर चर्चा रंगेल. त्यानंतर कविसंमेलन होईल. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होतील. संमेलनासाठी महाराष्ट्रभरातून साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. शिवाय बेळगाव, धारवाड, राजस्थान येथूनही कवी येणार आहेत. सामाजिक जबाबदारी म्हणून संमेलनस्थळी रक्तदान शिबिरही आयोजित केले आहे.

Leave a Comment