औरंगाबाद प्रतिनिधी । देशातील विद्यापीठ ही आंदोलनाची केंद्र का बनलीत याचा विचार करणं सध्या गरजेचं बनलं आहे. दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामीया विद्यापीठात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन विरोध झाल्यानंतर शनिवारी संध्याकाळी चेहरे झाकलेल्या गुंडांकडून जेएनयूमधील विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याची घटना समोर आली. या घटनेचा देशभरातून निषेध करण्यात येत असून औरंगाबादमधील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थांनी मानवी साखळी करीत निषेध रॅली काढली.
यावेळी हजारहून अधिक विद्यार्थी रॅलीमध्ये सहभागी झाले होते. जेएनयूमधील घटनेचा निषेध करत असताना, आवाज दो – हम एक हैं, जयभीम, मोदी सरकार मुर्दाबाद, अभाविप आणि आरएसएसचा विरोध असो अशा घोषणा यावेळी विद्यार्थ्यांनी दिल्या. दरम्यान महाराष्ट्रात ठिकठिकाणी या घटनेचे पडसाद उमटत असून विद्यार्थ्यांचे मोर्चे निघाल्याचंही पहायला मिळालं.