औरंगाबाद – लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत मराठवाड्यातील बारा विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे यामध्ये लातूर 5 बीड 3, हिंगोली 1 आणि नांदेडच्या 3 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. लातूरचा विनायक महामुनी देशभरातून 95 वा तर नितिषा नितिषा जगतापने 199 वा क्रमांक मिळविला आहे.
नांदेड जिल्ह्यातील तिघांचे यश –
नांदेड जिल्ह्यातील रजत नागोराव कुंडगीर याने 600, बाबुळगाव येथील शिवहार चक्रधर मोरे याने 649, तर नांदेडच्या सुमित कुमार दत्ता हरी धोत्रे याने 660 रॅंक मिळवीत यूपीएससी परीक्षेत यश संपादन केले आहे. यातील रजत कुंडगीर हे पोलीस अधिकारी कुटुंबातील आहेत. तर बाबुळगावचे शिवहार मोरे हे शेतकरी कुटुंबातील असून सुमितकुमार धोत्रे हे पत्रकार कुटुंबातील आहेत.
बीडमधील तिघांची भरारी –
बीडच्या शिरूर तालुक्यातील वारणी येथील शुभम नागरगोजे यांनी यूपीएससी परीक्षेत 453 वा क्रमांक पटकावला आहे. तसेच जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यातील देवळा येथील डॉ. किशोरकुमार अशोकराव देवरवाडे यांनी 735 वा क्रमांक पटकावला तर बीडचा यशवंत अभिमन्यू मुंडे याने देशात 502 वा क्रमांक पटकावला आहे.
हिंगोलीचा वैभव चमकला –
हिंगोली येथील वैभव सुभाषराव बांगर यांनी वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी व पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीच्या परीक्षेत 442 विहारांकडे यश मिळवून हिंगोलीकरांचा अभिमान बनला आहे.
लातूरची शिक्षणाची वैभवशाली परंपरा कायम –
लातूर जिल्ह्यातील विनायक महामुनी 95, नितिषा जगताप 199, शुभम स्वामी 523, पूजा कदम 577 आणि नीलेश गायकवाडने 629 रॅंक मिळवून लातूरच्या शिक्षणाची वैभवशाली परंपरा कायम ठेवली आहे. यातील नितिषा जगतापने तर पहिल्याच प्रयत्नात पदवी परीक्षा देऊन यूपीएससीचे शिखर गाठले आहे. वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी नितिषाने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीच्या परीक्षेत उच्चांक केला आहे.