हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आता फेब्रुवारी महिना संपून मार्च महिन्याला सुरुवात होईल. त्यामुळेच आरबीआय बँकेकडून मार्च महिन्यात बँकांना असणाऱ्या सुट्ट्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार मार्च महिन्यात तब्बल 14 दिवस बँकांमध्ये कोणत्याही काम होणार नाही. तसेच मार्च महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असल्यामुळे तेव्हा देखील बँक बंद राहील. त्यामुळे ही यादी तपासून तुम्ही आत्ताच बँकेची अपूर्ण कामे करून घ्या.
मार्च महिन्यामध्ये तब्बल 14 दिवस वेगवेगळ्या कारणांसाठी सुट्ट्या आल्या आहेत. यात रविवार आणि सार्वजनिक सुट्टी तसेच काही प्रादेशिक सुट्ट्यांचा देखील समावेश आहे. या मार्च महिन्यात होळीचा सण आला असल्यामुळे 25 मार्चला सार्वजनिक सुट्टी असेल. तसेच इतर राज्यांमध्ये वेगवेगळ्या सणावारांसाठी सुट्ट्या राहतील. याबरोबर मार्चच्या रविवार, दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतील. या काळात बँकेची कोणतीही कामे करता येणार नाहीत.
आरबीआयच्या यादीनुसार, 1मार्च, 8मार्च, 22मार्च, 25मार्च, 26मार्च, 27 मार्च आणि 29 मार्चला बँकांना सुट्टी असेल. मार्च महिन्यामध्ये पाच रविवार येत आहेत. म्हणजेच 3मार्च, 10मार्च, 17मार्च, 24मार्च आणि 31 मार्चला बँकेला नियमित सुट्टी असेल. याव्यतिरिक्त इतर दिवशी बँकांची कामे सुरू राहतील. तेव्हा तुम्ही तुमची बँकेची कामे करून घेऊ शकता.
दरम्यान, कोणाला पैसे पाठवायचे असतील किंवा काढायचे असतील तर डिजिटल बँकिंग सेवेच्या माध्यमातून तुम्हीही कामे करू शकता. तसेच एटीएम मशीनच्या माध्यमातून तात्काळ पैसे काढू शकता. आता UPI पेमेंट सिस्टम असल्यामुळे याचा फायदा बँक बंद असली तरी होतो. मात्र तुम्हाला बँकेत जाऊन एखादे काम करायचे असेल तर त्यासाठी बँकेच्या सुट्ट्या माहीत असणे आवश्यक आहे. या सुट्ट्या जाणून घेण्यासाठी तुम्ही www.rbi.org.in वेबसाईटला भेट देऊ शकता.