पुण्यातील ससून रुग्णालयामधील MARD डॉक्टर्स संपावर; आवश्यक मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे संप सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये मार्ड- (महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेन्शिअल डॉक्टर्स) म्हणजेच निवासी डॉक्टर संघटनेने संप पुकारला आहे. यामध्ये डॉक्टर्स आणि नर्सेस यांच्या कमतरतेमुळे होणारी गैरसोय पाहता लवकरात लवकर वाढवण्यात येणार बेड सोबतच मनुष्यबळही वाढविण्यात यावे. या मागणीसाठी ससूनमधील मार्ट संघटनेचे डॉक्टर संपावर गेले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा सध्याच्या घडीला बंद आहेत. यामुळे इतर रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.

केंद्र शासनाच्या मदतीने राज्य शासन हे इतर रुग्णालयांसोबत ससूनमध्ये 300 बेड हे करोना रुग्णांसाठी वाढवत आहे. पण 300 बेड सोबतच मनुष्यबळ वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला नाही. सध्याच्या घडीला ससूनमधील एक डॉक्टर हे सरासरी 30 रुग्णांना उपचार देत आहेत. जर 300 अतिरिक्त बेड वाढले आणि डॉक्टरांची संख्या आहे तीच राहिली तर एका डॉक्टरला 70 ते 80 पेशंट पहावे लागतील. यामुळे रुग्णांना उपचारांमध्ये अडचणी निर्माण होतील. तसेच एका डॉक्टरसाठी हे खूप अडचणीचे ठरणार आहे. यामुळे सरकारने बेड सोबतच मनुष्यबळही वाढवावे. असे मार्ड संघटनेच्या डॉक्टरांनी हॅलो महाराष्ट्रशी बोलताना सांगितले.

ससून रुग्णालयामध्ये मार्ड संघटनेच्या डॉक्टरांनी पुकारलेल्या संपाला सर्व संघटनेने प्रतिसाद दिला आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वैद्यकीय सेवा संप चालू असेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये ओपीडी आणि इतर सेवांचा समावेश असेल. अत्यावश्यक सेवामध्ये इमर्जन्सी आणि covid-19 वार्ड तसेच इतर वार्डमध्ये ऍडमिट केलेले पेशंट यांना वैद्यकीय उपचार देण्यात येत आहेत. यामुळे शासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढून ससूनमधील उपचार पद्धती परत सुरू करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment