मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी एमएमआरडीए प्राधिकरणाची 158 वी बैठक झाली. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. त्यापैकीच एक असलेल्या दक्षिण मुंबईतील बॅकबे रिक्लेमेशन योजनेतील ब्लॉक तीन आणि चार यांचा कायापालट होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीएने या योजनेचा सुधारित आराखडा तयार केला आहे.
समुद्रात भराव करण्यात येणार
सुधारित आराखडा नुसार या भागातील विधान भवनाच्या विस्तार प्रकल्पासह नरिमन पॉईंट ते जगन्नाथ भोसले मार्ग अशा नवीन मार्गाची उभारणी प्रस्तावित करण्यात आली आहे त्याचबरोबर नरिमन पॉईंट ते कल्चरल क्लास मरीन प्रकल्पासह विविध सांस्कृतिक सोयी सुविधांचा ही विकास केला जाणार असून त्यासाठी समुद्रात भराव करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
बॅकबे रिक्लेमेशन योजनेच्या भागात सुरू असलेल्या सरकारी आणि खाजगी संस्थांच्या प्रकल्पाच्या म्हणजेच झोपडपट्टी पुनर्वसन आणि मेट्रो प्रकल्पांच्या अनुषंगाने यापूर्वी आराखड्यात बदल करण्यात आला. तसेच हा मसुदा निवासी आणि व्यावसायिक अशा भागात विभागण्यात आला आहे. समुद्रकिनारी आणि खारफुटी सारख्या नैसर्गिक वैशिष्ट्यांवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. असं मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी नमूद केले .
नरिमन पॉईंट जवळून जगन्नाथ भोसले मार्ग यांना जोडणी देण्यासाठी नवीन रस्त्याची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे या भागातील वाहतूक सुटसुटीत होणार आहे.यापूर्वी या भागात सागरी सेतू उभारण्याचे नियोजन केले होते. मात्र मच्छीमारांच्या विरोधानंतर त्यामध्ये बदल करून आता कोस्टल रोड उभारण्याचे निश्चित करण्यात आले. आता हा सुधारित प्रारूप आराखडा नागरिकांच्या सूचना मागवण्यासाठी प्रसिद्ध केला जाणार आहे. असंही MMRDA च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
काय असतील सुविधा ?
- मच्छीमारांच्या बोटी साठी पार्किंगची सुविधा
- विशिष्ट थीमवर आधारित समुद्रात कारंजाची निर्मिती.
- रेस्टॉरंट आणि अन्य सुविधांची निर्मिती.
- आयकॉनिक शिल्पांची निर्मितीने समुद्र तटावर बसण्यासाठी पायऱ्यांची सुविधा.
- अंडरवॉटर ओशियारीयम निर्मिती
- कल्चरल प्लाझा जवळ पॉईंटची उभारणी.
या असतील नव्या सुविधा
खाद्यपदार्थांचे स्टॉल, फिशरमेन कॉलनी पार्क, सार्वजनिक जिम, पब्लिक स्पेस, पेट पार्क, नाना नानी पार्क, सेंड कॅसल्स उभारणी, नरिमन पॉईंट इथं मरीना प्रकल्पात बोटी आणि लोकांसाठी खास बंदराची निर्मिती आणि कल्चरल प्लाझाची उभारणे या सुविधा नव्याने उभ्या राहणार आहेत.