टॉप 10 पैकी 5 कंपन्यांची मार्केट कॅप 85,712.56 कोटींनी वाढली, TCS ला झाला सर्वाधिक फायदा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । गेल्या आठवड्यात सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांपैकी 5 कंपन्यांची मार्केटकॅप 85,712.56 कोटी रुपयांनी वाढली. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS मार्केट कॅपच्या दृष्टीने सर्वात जास्त वाढला.

रिपोर्टींग वीकमध्ये TCS ची मार्केटकॅप 36,694.59 कोटी रुपयांनी वाढून 14,03,716.02 कोटी रुपयांवर पोहोचली तर रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केटकॅप 32,014.47 कोटी रुपयांच्या वाढीसह 16,39,872.16 कोटी रुपये राहिली.

कोणत्या कंपनीला किती फायदा झाला ?
हिंदुस्तान युनिलिव्हरची मार्केटकॅप 12,781.78 कोटी रुपयांनी वाढून 5,43,225.5 कोटी रुपयांवर पोहोचली. याशिवाय HDFC ने आठवड्यात 2,703.68 कोटी रुपयांची भर घातली आणि तिची मार्केटकॅप 4,42,162.93 कोटी रुपयांवर पोहोचली. बजाज फायनान्सची मार्केटकॅप 1,518.04 कोटी रुपयांनी वाढून 4,24,456.6 कोटी रुपये झाली.

कोणत्या कंपनीचे किती नुकसान झाले ?
तर दुसरीकडे रिपोर्टींग वीकमध्ये, HDFC बँकेची मार्केटकॅप 3,399.6 कोटी रुपयांनी घसरून 8,38,529.6 कोटी रुपयांवर आणि इन्फोसिसची मार्केटकॅप 5,845.84 कोटी रुपयांनी घसरून 7,17,944.43 कोटी रुपये झाली. ICICI बँकेची मार्केटकॅप 28,779.7 कोटींनी घसरून 5,20,654.76 कोटी रुपये तर स्टेट बँक ऑफ इंडियाची मार्केटकॅप 12,360.59 कोटींनी घसरून 4,60,019.1 कोटी रुपये झाले. भारती एअरटेलची मार्केटकॅप 961.11 कोटी रुपयांनी घसरून 3,91,416.78 कोटी रुपयांवर आली.

टॉप 10 कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या स्थानावर आहे
टॉप 10 कंपन्यांच्या लिस्टमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या स्थानावर आहे. त्यापाठोपाठ टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, एचडीएफसी, बजाज फायनान्स आणि भारती एअरटेल यांचा क्रमांक लागतो.

Leave a Comment