Monday, February 6, 2023

Sensex च्या 10 पैकी 8 कंपन्यांची मार्केट कॅप घसरली, RIL अव्वल स्थानी

- Advertisement -

नवी दिल्ली । सेन्सेक्स (BSE Sensex) च्या टॉप दहा कंपन्यांपैकी आठ कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये गेल्या आठवड्यात एकत्रितपणे 65,176.78 कोटी रुपयांची घसरण झाली. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि एचडीएफसी बँक (HDFC Bank) यांना सर्वाधिक तोटा झाला. केवळ रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) आणि हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) च्या आढावा अंतर्गत आठवड्यात बाजारातील भांडवलाची वाढ दिसून आली.

TCS ची मार्केट कॅप मागील आठवड्यात 20,400.27 कोटी रुपयांनी घसरून 12,30,138.03 कोटी रुपयांवर गेले. एचडीएफसी बँकेची मार्केट कॅप 18,113.03 कोटी रुपयांनी घसरून 8,18,313.66 कोटी रुपयांवर गेली. एचडीएफसीची मार्केट कॅप 5,837.3 कोटी रुपयांनी घसरून 4,46,941.10 कोटी तर आयसीआयसीआय बँकेची मार्केट कॅप 5,762.02 कोटींनी घसरून 4,43,404.75 कोटी रुपयांवर गेली.

- Advertisement -

या कंपन्यांची मार्केट कॅप वाढली
बजाज फायनान्स लिमिटेडची मार्केट कॅप 4,614.48 कोटी रुपयांनी घसरून 3,62,047.96 कोटी आणि स्टेट बँक ऑफ इंडियाची मार्केट कॅप 3,748.34 कोटी रुपयांनी घसरून 3,78,894.38 कोटींवर गेली. त्याशिवाय कोटक महिंद्रा बँकेची मार्केट कॅप 3,697.15 कोटी रुपयांनी घसरून 3,40,237.26 कोटी आणि इन्फोसिसची मार्केट कॅप 3,004.19 कोटी रुपयांनी घसरून 6,67,911.74 कोटी रुपयांवर घसरली.

या कंपन्यांची मार्केट कॅप घसरली
या ट्रेंडच्या विपरीत, रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप 15,785.21 कोटी रुपयांनी वाढून 13,49,794.23 कोटी रुपयांवर गेली. हिंदुस्तान युनिलिव्हरची मार्केट कॅप 9,245.63 कोटी रुपयांनी वाढून 5,84,695.18 कोटी रुपयांवर गेली.

या कंपन्या टॉप -10 मध्ये होत्या
रिलायन्स इंडस्ट्रीजने टॉप 10 कंपन्यांच्या लिस्टमध्ये पहिले स्थान कायम राखले आहे. त्यापाठोपाठ अनुक्रमे टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, बजाज फायनान्स आणि कोटक महिंद्र बँक यांचा क्रमांक लागतो. गेल्या आठवड्यात BSE चा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 440.37 अंकांनी किंवा 0.83 टक्क्यांनी घसरला.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group