टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची मार्केट कॅप 1.03 लाख कोटींनी घसरली, TCS ला बसला सर्वाधिक फटका

नवी दिल्ली ।सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांपैकी नऊ कंपन्यांची मार्केटकॅप गेल्या आठवड्यात एकत्रितपणे 1,03,532.08 कोटी रुपयांनी घसरली. मार्केट कॅपच्या बाबतीत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS ला सर्वाधिक फटका बसला.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मार्केट कॅपमध्ये वाढ
गेल्या आठवड्यात बीएसईचा 30 शेअर्स असलेला सेन्सेक्स 491.90 अंकांनी किंवा 0.83 टक्क्यांनी घसरला. टॉप 10 कंपन्यांमध्ये फक्त रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप वाढले. रिपोर्टिंग वीकमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केटकॅप 30,474.79 कोटी रुपयांनी वाढून 16,07,857.69 कोटी रुपयांवर पोहोचली. दुसरीकडे, TCS ची मार्केटकॅप 44,037.2 कोटी रुपयांनी घसरली आणि 13,67,021.43 कोटी रुपयांवर आली.

कोणत्या कंपनीचे किती नुकसान झाले?
HDFC ची मार्केटकॅप 13,772.72 कोटी रुपयांच्या तोट्यासह 4,39,459.25 कोटी रुपयांवर घसरली. हिंदुस्थान युनिलिव्हरची मार्केटकॅप 11,818.45 कोटींनी घसरून 5,30,443.72 कोटी तर ICICI बँकेची मार्केटकॅप 9,574.95 कोटींनी घसरून 5,49,434.46 कोटी झाली. बजाज फायनान्सची मार्केटकॅप 8,987.52 कोटी रुपयांनी घसरून 4,22,938.56 कोटी रुपये आणि इन्फोसिसची मार्केटकॅप 8,386.79 कोटी रुपयांनी घसरून 7,23,790.27 कोटी रुपये झाले.

भारती एअरटेलने रिपोर्टिंग वीकमध्ये 3,157.91 कोटी रुपयांचा तोटा नोंदवला आणि तिची मार्केटकॅप 3,92,377.89 कोटी होती. HDFC बँकेची मार्केटकॅप 2,993.33 कोटी रुपयांनी घसरून 8,41,929.20 कोटी रुपयांवर आली. त्याचप्रमाणे स्टेट बँक ऑफ इंडियाची मार्केटकॅप 803.21 कोटी रुपयांनी घसरून 4,72,379.69 कोटी रुपयांवर आली.

टॉप 10 कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या स्थानावर आहे
टॉप 10 कंपन्यांच्या लिस्टमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या स्थानावर आहे. त्यापाठोपाठ टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, एसबीआय, एचडीएफसी, बजाज फायनान्स आणि भारती एअरटेल यांचा क्रमांक लागतो.