सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांपैकी आठ कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये झाली 1.51 लाख कोटी रुपयांची वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । गेल्या आठवड्यात सेन्सेक्समधील टॉप 10 मधील आठ कंपन्यांची मार्केट कॅप एकत्रितपणे 1,51,456.45 कोटी रुपयांनी वाढली. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) सर्वात जास्त वाढला. गेल्या आठवड्यात, बीएसईचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 1,444.59 अंकांनी किंवा 2.52 टक्क्यांनी वाढला होता.

टॉप 10 कंपन्यांच्या लिस्टमध्ये फक्त रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसीच्या मार्केट कॅपमध्येच घसरण झाली आहे. रिपोर्टिंग वीकमध्ये TCS ची मार्केट कॅप 46,016.2 कोटी रुपयांनी वाढून 14,11,058.63 कोटी रुपये झाली आहे. HDFC बँकेची मार्केट कॅप 33,861.41 कोटींनी वाढून 8,44,922.53 कोटी रुपये झाली.

बँकांचे शेअर्स वधारले
इन्फोसिसची मार्केट कॅप 23,425.29 कोटी रुपयांनी वाढून 7,32,177.06 कोटी रुपये झाली. बजाज फायनान्सची मार्केट कॅप 17,226.59 कोटींच्या नफ्यासह 4,31,926.08 कोटी आणि ICICI बँकेची मार्केट कॅप16,601.55 कोटींनी वाढून 5,59,009.41 कोटी झाली.

भारती एअरटेलची मार्केट कॅप वाढली
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ची मार्केट कॅप 6,113.36 कोटी रुपयांनी वाढून 4,73,182.90 कोटी रुपये झाली. त्याचप्रमाणे हिंदुस्थान युनिलिव्हरची मार्केट कॅप 5,850.48 कोटी रुपयांनी वाढून 5,42,262.17 कोटी रुपये झाले. भारती एअरटेलने या आठवड्यात 2,361.57 कोटी रुपयांची भर घातली आणि तिची मार्केट कॅप 3,95,535.80 कोटी रुपयांवर पोहोचली.

रिलायन्स इंडस्ट्रीज खाली
याच्या विरुद्ध, HDFC ची मार्केट कॅप 2,870.45 कोटी रुपयांनी घसरून 4,53,231.97 कोटी रुपयांवर आले. रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप 2,396.57 कोटी रुपयांनी घसरून 15,77,382.90 कोटी रुपये झाली.

टॉप 10 कंपन्यांच्या लिस्टमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने पहिले स्थान कायम राखले आहे. त्यापाठोपाठ टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, एसबीआय, एचडीएफसी, बजाज फायनान्स आणि भारती एअरटेल यांचा क्रमांक लागतो.

Leave a Comment