अनलॉक नंतर पहिल्याच दिवशी शहरातील भाजीपाल्याचे बाजार भाव; वाचा सविस्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | एक वर्षापासून संपूर्ण राज्यभर कोरोना महामारीचे संकट उभ ठाकलं आहे. यातच आता औरंगाबाद शहराचा दर 5 टक्क्यांपेक्षा कमी आल्यामुळे आजपासून औरंगाबाद शहर अनलॉक करण्यात आले आहे. यामुळे आता नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याचे दिसत आहे. आजपासून शहरातील मॉल, बाजारपेठ, हॉटेल, रेस्टॉरंट, बस सेवा आणि क्रीडा मैदान, समारंभ नियमितपणे सुरू राहणार आहेत.औरंगाबाद मधील भाजी मंडई भाजीपाल्याने सजलेली दिसत आहे.

टोमॅटो आज 20 रुपये किलोने विकले जात आहेत. पालेभाज्या मध्ये मेथीची जुडी, कोथंबीर जुडी त्याचबरोबर शेपू 10 रुपये जुडीने तर पालक 5 रुपये जुडी अशा भावाने विकल्या जात आहेत. फलभाज्या मध्ये बटाटा 25 रुपये किलो तर भेंडी सुद्धा 25रुपये किलोने विकली जात आहे. त्याचबरोबर 8 दिवसांपासून बाजारात जांभूळ सुद्धा दिसत आहे.  यामध्ये गावरान जांभूळ 50 रुपये किलो तर राय जांभूळ 70 रुपये किलोने विकले जात आहे.  यातच लोणचं करण्यासाठी कैरी 60रुपये किलोने आणि कैरी फोडण्यासाठी 15 रुपये किलोने (कैरी तुमची असेल तर) विकल्या जात आहे.

लॉकडाऊन असल्यामुळे भाजी पाल्याला भाव मिळत नाही. त्याचबरोबर ग्राहक सुद्धा जास्त येत नसल्यामुळे भाजीपाला फेकून द्यावा लागतो अशा प्रतिक्रिया भाजी विक्रेत्यांनी दिल्या. “लॉकडाऊन पूर्वी 99% व्यवहार होत होता परंतु आता 20% व्यवहार सुरु आहे. दिवसाचे फक्त 100 रुपये निघतात” अस मत भाजी विक्रेत्यांनी व्यक्त केले.आज अनलॉक झाल्याच्या पहिल्याच दिवशी भाजीपाला घेण्यासाठी गर्दी जास्त प्रमाणात दिसली नाही. पण हळूहळू भाजी खरेदी साठी ग्राहक येतील अशी आशा भाजी विक्रेते यांनी केली आहे.

Leave a Comment