Stock Market : आज बाजार नफ्यासह बंद झाला, ऑटो आणि PSU बँकामध्ये झाली घसरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । आठवड्याच्या पहिल्या व्यापारी दिवशी बाजार विक्रमी पातळीवर बंद झाला. सेन्सेक्स 145.29 अंकांच्या वाढीसह 55,582.58 वर बंद झाला. तर दुसरीकडे, निफ्टी 33.95 अंक किंवा 0.21 टक्क्यांच्या वाढीसह 16,563.05 वर बंद झाला. मेटल स्टॉक वाढले तर ऑटो स्टॉकमध्ये विक्री दिसून आली. PSU बँकामध्येही घसरण झाली.

आजच्या व्यापार दिवसात बाजारात तेजी दिसून आली आणि सेन्सेक्स-निफ्टीने पुन्हा एकदा नवीन विक्रमी पातळी गाठली. आज निफ्टीने इंट्रा डे मध्ये 16,585 चा नवा विक्रम केला. त्याच वेळी, सेन्सेक्सने 55,680 च्या नवीन विक्रमाला स्पर्श केला.

27 ऑगस्टपासून फ्युचर्स अँड ऑप्शन्स (F&O) विभागात आणखी 10 पर्याय उपलब्ध होतील. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) च्या मते, 27 ऑगस्टपासून या सेगमेंटमध्ये आणखी 10 शेअर्सचे ट्रेडिंग सुरू होतील. यामध्ये डिक्सन टेक्नॉलॉजीज, कॅन फायनान्स होम्स, इंडियामार्ट, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL), पॉलीकॅब इंडिया, इप्का लॅब, ओरॅकल फायनान्शियल, सिन्जेन इंटरनॅशनल, इंडियन एनर्जी एक्सचेंज आणि MCX यांचा समावेश आहे. NSE च्या मते, F&O विभागात या शेअर्सच्या प्रवेशाच्या एक दिवस आधी बाजाराची माहिती उपलब्ध होईल. केवळ बाजार नियामक सेबीने ठरवलेल्या मानकांच्या आधारे या शेअर्सचा या विभागात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

NSE 50 – टॉप गेनर्स
M&M
BPCL
TATASTEEL
RELIANCE
IOC

NSE 50 – टॉप लुझर्स
SHREECEM
BAJAJ-AUTO
MARUTI
POWERGRID
EICHERMOT

Leave a Comment