व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

प्रेयसी लग्न करण्यासाठी देत होती त्रास,यानंतर प्रियकराने तिलाच संपवले

मुजफ्फरनगर : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगर या जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका विवाहित प्रियकराने त्याच्या 24 वर्षीय प्रेयसीचे अपहरण करून तिची हत्या केली आहे. हि घटना जानसठ परिसरातील कवाल या ठिकाणी घडली आहे. रविवारी तैमून नावाच्या तरुणाने त्याची प्रेयसी तबस्सुमची हत्या केली. तरुणी बेपत्ता झाल्यानंतर तिच्या घरच्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी चौकशी करून आरोपी तैमूरला अटक केली आहे.

तबस्सुम हि तैमूरवर लग्नासाठी दबाव आणत होती. पण तो आधीच विवाहित होता.यामुळे या दोघांमध्ये सतत वाद व्हायचे. तैमूर या सगळ्याला कंटाळला होता. तेव्हा त्याने तबस्सुमपासून सुटका करून घेण्यासाठी त्याने तिचे अपहरण करून तिची हत्या केली. यानंतर त्याने तबस्सुमचा मृतदेह कालव्यामध्ये फेकून दिला होता अशी माहिती पोलिस अधिकारी डी.के त्यागी यांनी दिली आहे.

यानंतर पोलिसांनी या घटनेची चौकशी करण्यास सुरुवात केली. यानंतर पोलिसांनी तबस्सुमचा प्रियकर तैमूर याला ताब्यात घेतले. पहिल्यांदा त्याने आपला गुन्हा कबुल नाही केला पण जेव्हा पोलिसांनी आपला हिसका दाखवला तेव्हा तैमूरने आपला गुन्हा मान्य केला. तसेच त्याने तबस्सुमची हत्या करून तिचा मृतदेह कालव्यामध्ये फेकून दिल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी तबस्सुमचा मृतदेह शोधून तो श्वविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.