Thursday, March 30, 2023

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने उचलले ‘हे’ पाऊल

- Advertisement -

लातूर : हॅलो महाराष्ट्र – लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील देवकरा या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये सासू सासऱ्यांच्या जाचाला कंटाळून विवाहितेने झाडाला गळफास लावून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे.

आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव अनिता गुट्टे असे होते. त्या 32 वर्षांच्या होत्या. मृत अनिता यांनी पळसाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आज सकाळी हि घटना उघडकीस आली.अनिताने सासू- सासऱ्यांच्या जाचाला कंटाळून हे पाऊल उचलले असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी किनगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

अनिताचे सासरे नामदेव गुट्टे आणि सासू हे मुलाला घेऊन नवऱ्या सोबत मुंबईला राहायला जा म्हणून सतत मानसिक आणि शारीरिक त्रास देत होते. या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर अनिताने सुभाष चाटे यांच्या शेतातील पळसाच्या झाडाला गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून किनगाव पोलिस पुढील तपास करत आहेत.